नागपूर : नागपूरसह विदर्भ आणि राज्यातील अनेक भागात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. आज (दि.३०) पहाटेच्या सुमारास नागपुरातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. लग्नसमारंभाला पावसाचा फटका बसला. तर दुसरीकडे दुपारी कडक ऊन होते. महाराष्ट्रात पुढील 24 तासांत उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. पुढील 24 तासांत मराठवाडा, विदर्भात पावसाची शक्यता कायम आहे.
राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. त्यातच कुठे ऊन तर कुठे पाऊस, अशी परिस्थिती असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दरम्यान मे महिना सुरू झाल्याने सूर्य आग ओकत असल्याचा अनुभव येत आहे. ३ मेपासून तापमान अधिकच वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
लहरी हवामानाचा रानमेव्याला फटका
दरम्यान, सध्याच्या लहरी हवामानामुळे नैसर्गिक रानमेवा उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. उन्हाळा म्हटला की, रानमेवा चाखण्याची आस सर्वांनाच लागलेली असते. मात्र, यंदा एप्रिल महिना संपत आला, तरी नागरिकांना रानमेव्याची प्रतीक्षा आहे. करवंद, रसदार जांबळे, आंबट गोड चिंच, कैऱ्या अशा प्रकारचा रानमेवा या काळात मिळतो. मात्र, यंदाच्या लहरी हवामानामुळे या सर्व रानमेव्याला मोठा फटका बसला आहे. विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता कायम आहे. राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. त्यातच कुठे ऊन तर कुठे पाऊस अशी परिस्थिती असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. ३ मेपासून तापमान वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. उष्माघाताचे प्रमाण वाढले आहे.