• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 15, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

आता डमी परीक्षार्थींना बसणार चाप..! ऑनलाइन टंकलेखन परीक्षेत बदल…

Our Media by Our Media
April 30, 2024
in Featured, अकोला, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ, शिक्षण
Reading Time: 1 min read
85 1
0
टायपिंग संस्थेलाच दिले परीक्षेचे काम! राज्य परीक्षा परिषदेची चुकीची निविदा
12
SHARES
614
VIEWS
FBWhatsappTelegram

पुणे : डिसेंबर 2023 व त्यापूर्वी झालेल्या संगणक टंकलेखन परीक्षेमध्ये काही परीक्षा केंद्रांवर डमी उमेदवार बसवणे, या डमी उमेदवारामार्फत परीक्षा केंद्रामध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांचे स्पीड पॅसेज टंकलिखित करून देणे, बाजूच्या खोलीमधील संगणकाच्या माध्यमातून डमी उमेदवाराकडून उत्तरपत्रिका सोडवून घेणे, अशा गंभीर स्वरूपाचे गैरप्रकार झाल्याचे आढळून आले. या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी राज्य परीक्षा परिषदेने पावले उचलली असून ऑनलाइन टंकलेखन परीक्षेत परिषदेकडून आमूलाग्र बदल केले असल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिली.

डॉ. बेडसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, डमी उमेदवारांच्या माध्यमातून स्पीड पॅसेज सोडवता येऊ नये यासाठी, पूर्वीच्या प्रश्नांमधील क्रम बदलण्यात येत असून जून 2024 मध्ये होणार्‍या इंग्रजी / मराठी / हिंदी 30 व 40 शब्द प्रति मिनिटच्या संगणक टंकलेखन परीक्षेमध्ये, सर्वांत पहिले पाच मिनिटांचा ई-मेल व त्यानंतर लगेचच 7 मिनिटांचा स्पीड पॅसेजचा प्रश्न विद्यार्थ्यांना सोडविण्यासाठी देण्यात येणार आहे. त्यानंतर स्टेटमेंट, लेटर, ऑब्जेक्टिव्ह अशा क्रमाने प्रश्न सोडविण्याकरिता उपलब्ध करून देण्यात येतील. सुरुवातीलाच स्पीड पॅसेजचाचा प्रश्न दिल्यामुळे कदाचित विद्यार्थ्यांना पॅसेज सोडविण्याची प्रॅक्टिस होणार नाही, अशी शक्यता गृहीत धरून, परीक्षा सुरू होण्यापूर्वीच्या 15 मिनिटांमध्ये 3 मिनिटांचा सराव उतारा सोडविण्याकरिता देण्यात येणार आहे.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

या ट्रायल पॅसेजला कोणत्याही प्रकारचे गुण देण्यात येणार नाही. तथापि विद्यार्थ्यांना मात्र 3 मिनिटांचा सराव उतारा सोडविणे बंधनकारक राहील. या माध्यमातून संगणकावरील कीबोर्डची चाचणीदेखील विद्यार्थ्यांना आपोआपच होईल. लॉगिन होण्यापूर्वी हा ट्रायल पॅसेज देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांकडून लॉगिन झाल्यानंतर लगेचच 5 मिनिटांचा ई-मेलचा प्रश्न उपलब्ध करून देण्यात येईल. हा ई-मेलचा प्रश्न निर्धारित वेळेनंतरच म्हणजे पूर्ण 5 मिनिटे झाल्यावरच अ‍ॅटो सबमीट होणार आहे. गती उतारा संपल्यानंतर स्टेटमेंट, लेटर व ऑब्जेक्टिव्ह प्रश्न अशा क्रमाने प्रश्न विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येतील.

इंग्रजी / मराठी / हिंदी 30 व 40 शब्द प्रतिमिनिटच्या संगणक टंकलेखन परीक्षेमध्ये यापुढे ईमेलच्या प्रश्नाला असलेल्या आठ मिनिटांचा वेळ कमी करण्यात येत असून आता ईमेल प्रश्नासाठी 5 मिनिटे देण्यात येणार आहेत. परीक्षा सुरू होण्यापूर्वी 3 मिनिटे आधी ट्रायल पॅसेजची लिंक बंद करण्यात येईल. परीक्षा सुरू झाल्यापासून 5 मिनिटानंतर कुणालाही परीक्षेसाठी प्रवेश देण्यात येणार नाही. हा मुद्दा सर्व संस्थाचालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना नीटपणे समजावून सांगायचा आहे. या सत्रापासून एकाच विद्यार्थ्यांचे इंग्रजी 30, 40 शब्द प्रतिमिनिट टंकलेखनाचे अर्ज केले असतील तर त्यांना दोन्ही विषय मिळून एकच प्रवेश पत्र देण्यात येणार आहे. मात्र इंग्रजी व मराठीचे परीक्षा केंद्र हे साधारणपणे वेगवेगळे असल्यामुळे इंग्रजीसाठी आणि मराठीसाठी वेगवेगळे प्रवेश पत्र देण्यात येणार असल्याचे देखील डॉ. बेडसे यांनी स्पष्ट केले.

Previous Post

आशियाई देशांना २०२३ मध्ये नैसर्गिक आपत्तींचा सर्वाधिक फटका

Next Post

नागपुर मध्ये ऊन-पावसाचा खेळ..! नागरिक झाले हैराण.

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
Weather Forecast

नागपुर मध्ये ऊन-पावसाचा खेळ..! नागरिक झाले हैराण.

विद्यापीठ होणार ‘ ऑक्सफर्ड ऑफ द सेंटर आशिया ’

विद्यापीठ होणार ‘ ऑक्सफर्ड ऑफ द सेंटर आशिया ’

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.