पातूर (सुनिल गाडगे): अकोला लोकसभा मतदारसंघ निवडणूक २०२४ भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीचे अधिकृत उमेदवार अनुप धोत्रे यांच्या निवडणुक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन समारंभ ११ एप्रिल २०२४ रोजी पातूर येथे पार पडले. महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी पातुर निवडणूक प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त संवाद करण्यात आले ,याप्रसंगी महायुती चे प्रमुख पदाधिकारी व महायुती मधील घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यामध्ये उद्घाटक म्हणून आमदार आकाश फुंडकर, आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार हरीश पिंपळे, माजी आमदार बळीराम सिरस्कार, जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील,श्री.तेजराव थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब तायडे, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष नईम खान, राष्ट्रवादी शहराध्यक्ष बब्बूभाई, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गजानन पाटील,रामा अमानकर, राष्ट्रवादी काँग्रेस बाळापूर तालुका अध्यक्ष प्रशांत भाऊ गायकवाड, शिवसेनेचे शहरप्रमुख पवन तायडे, त्याच बरोबर भारतीय जनता पक्षाचे रमण जैन, तालुकाध्यक्ष भिकाभाऊ धोत्रे, प्रेमानंद श्रीरामे, विजयसिंह गहलोत, गजानन निमकाळे, जीएस खंडारे सर, चंद्रकांत अंधारे,राजू उगले, गजानन शेंडे, मंगेश केकण, भाजपा शहराध्यक्ष अभिजीत गहलोत, विनेश चव्हाण,कपिल खरप,अनंत बगाडे,सचिन ढोणे,संदीप तायडे, डिगांबर गोतरकर, सचिन बायस, गणेश गाडगे, दिलीप डोंगे, निलेश फुलारी, नवीन करंगळे, आशुतोष सपकाळ, नीरज कुटे, निलेश फुलारी, तसेच महिला आघाडीच्या सौ वैशाली निकम, महिला आघाडी तालुका अध्यक्ष सौ. नंदाताई काळे, सौ वर्षा बगाडे, सौ तुळसाबाई गाडगे, सौ शिला आवटे, सौ कल्पना खराटे, तसेच भारतीय जनता पक्षाचे पवन देवकते, संजय उजाडे, विठ्ठल ताले, सागर आखरे, अंकुश राठोड, सोपान फाटकर, गणेश वांडे, विवेक वांडे, सुनील हलवणकर, व मोठ्या प्रमाणावर महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते, निवडणूक प्रचार कार्यालयाच्या उद्घाटना निमित्य आमदार आकाश फुंडकर यांनी केवळ विकास कामांची चर्चा करत उमेदवारांचा प्रचार करण्याचे सांगत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुती सरकारच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यात झालेल्या विकास कामे मतदारांपर्यंत पोहचवा असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पातुर येथील पातुर नगर परिषदेचे माजी सभापती तथा माजी समता परिषद अध्यक्ष डॉक्टर टी एम ढोणे तसेच माजी नगरपरिषद उपाध्यक्ष सौ सुमनताई तुळशीराम ढोणे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला, त्याचप्रमाणे पातुर येथील काँग्रेसचे नगरसेवक हुसेन शहा तय्यब शहा व सय्यद अनिस सय्यद जमील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश करण्यात आले त्यामध्ये बाळकृष्ण सावंत, काशीराम शेगोकार, दिलीप पाटील, सुरेश पाटील, सूर्यभान तायडे, गुणवंत पाटील,समाधान चतरकर, देवानंद शेळके, दिगंबर इंगळे, दिनकर ढोणे, विनोद ससाने, प्रमोद हरमकार, पुंजाराम इंगळे यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला.