अकोला : राजेश दिनोदिया राहणार शालिनी टॉकीज मागे तिलक रोड अकोला या व्यक्तीची बजाज फायनान्स कडून फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे राजेश दिनोदिया या व्यक्तीला बजाज फायनान्स कंपनीकडून वैयक्तिक लोन साठी फोन आला होता. त्या फोन द्वारे त्यांना एक लाख 26 हजार रुपये ऑफर असल्याचे सांगण्यात आले त्यांचे बजाज फायनान्स चे अगोदर चे जुने लोन 36 हजार रुपये बाकी होते. ते 36000 न भरता त्यांना फक्त 22 हजार रुपये भरावे लागतील म्हणजे एक लाख 26 हजार मधून 22 हजार रुपये कमी होऊन त्यांच्या अकाउंटला एक लाख चार हजार रुपये येतील असे बजाज कंपनीकडून सांगण्यात आले होते. परंतु तसे काहीही न घडता दिनांक 12 मार्च 2024 रोजी राजेश दिनोंदिया यांच्या बँक खात्यामध्ये एक लाख 26 हजार रुपये जमा झाले.
त्यांचे 22000 हे कमी झाले नसल्यामुळे ते बजाज फायनान्स च्या ऑफिसला गेले असता तेथे त्यांना अत्यंत उद्धटपणाची व अपनास्पद वागणूक मिळाली व त्यांनी आपल्या बँकेच्या खात्यामध्ये आलेल्या पैशाबद्दल विचारपूस केली. असता त्यांना असे सांगण्यात आले की तुमच्या अकाउंटला एक लाख 41 हजार रुपये जमा झाले असून त्याचे व्याज धरून तुम्हाला एक लाख 98 हजार 272 भरावे लागतील असे सांगण्यात आले राजेश दिनोदिया हे मजुरी करणारे व्यक्ती एवढे पैसे भरू शकत नसल्यामुळे त्यांनी आलेले एक लाख 26 हजार रुपये बजाज फायनान्स ला वापस द्यायचे कबूल केले. असता बजाज फायनान्स कडून त्यांना सांगण्यात आले की कमीत कमी सहा इंस्टॉलमेंट तुम्हाला भरावे लागतील. त्यानंतर तुमचे एक लाख 26 हजार जमा करता येतील. राजेश दिनोदिया यांना लोन पाहिजे नसल्यावरही त्यांच्या अकाउंटला एक लाख 26 हजार रुपये जमा झाले. असून एक लाख 98 हजार 262 रुपये त्यांना भरायचे आहेत असे सांगण्यात आले असून त्यांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांनी सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांच्या माध्यमातून ग्राहक तक्रार मंच पोलीस अधीक्षक यांच्या कडे सदर प्रकरणाबद्दल तक्रार दाखल केली असून न्याय मिळण्याची अपेक्षा केली आहे. व या बजाज फायनान्स कंपनीवर वर कारवाई करण्याची मागणी केली आले बजाज फायनान्स कंपनीवर योग्य ती कारवाईने झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा राजेश दिनोदिया यांनी दिला आहे.