अकोला : अग्निशमन दलाच्या शैक्षणिक व अनुभवाची अकोला महानगरपालिका कडे अग्निशमन विभाग प्रमुखाची कुठल्याही प्रकारची माहिती उपलब्ध नसलेल्या व्यक्तीवर अकोला शहराची अग्निशमन दलाच्या विभाग प्रमुखांची जबाबदारी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांनी मागितलेल्या माहिती अधिकारात माहिती उघड झाली. सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांनी माहिती अधिकार अर्जाद्वारे मो. हारुण मनियार हे मुख्य अग्निशमन अधिकारी यांची शैक्षणिक पात्रता व अग्निमशन विभागाचा अनुभव, अग्निशमन दलाचे प्रशिक्षण कुठुण आणि कोणत्या वर्षी घेतले. मो. हारुण मनियार यांना (NBC) राष्ट्रीय इमारत कोडची माहिती आहे का? मो. हारुण मनियार हे हॉस्पिटल, हॉटेल, शाळा, महाविद्यालय, सिनेमाघर, लॉज, इतर रहिवासी इमारती ,खाजगी शिकवणी वर्गला नाहरकत प्रमाणपत्र देण्याचा अधिकार आहे का? ईत्यादी माहिती अकोला महानगरपालिका माहिती अधिकारी यांना मागितली होती. त्या माहिती अधिकाराचे उत्तर माहिती उपलब्ध नाही असे देण्यात आले.
अकोला महानगरपालिका अग्निशमन विभागामध्ये नेशनल टेक्सटाईल कॉ.लि. भारत सरकार अंतर्गत फिनले मिल्स अचलपुर मधुन प्रबंधक सुरक्षितता / अभियांत्रीकी या पदावरुन सेवानिवृत्त झालेले श्री एम हारुण मनियार यांना करार पध्दतीने मुख्य अग्निशमन अधिकारी या पदावर अग्निशमन विभागात दिनांक ०१/०४/२०२२ ते दिनांक ३१/०३/२०२३ पर्यंत शासन निर्णय मधील तरतुदी, शर्ती व अटीच्या अधिनराहून करार पध्दतीने घेण्यात आले आहे. सदर मुदतवाढ दिनांक ३१/०३/२०२३ रोजी संपुष्टात आली असल्यामुळे त्यांना जानेवारी २०२४ मध्ये परत मुदतवाढ देण्यात आली. अग्निशमन दलाच्या शैक्षणिक व अनुभवाची महानगरपालिका कडे अग्निशमन विभाग प्रमुखाची कुठल्याही प्रकारची माहिती उपलब्ध नाही तर मग त्यांना अग्निशमन प्रमुख पदाची धुरा कशी काय सोपविण्यात आली हा प्रश्न उपस्थित होत आहे.
मुख्य अग्निशमन अधिकारी पदासाठी राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर येथून किमान पूर्ण केलेला ॲडव्हान्स डिप्लोमा असावा आणि त्याला Dy चा किमान 3 वर्षांचा अनुभव असावा. परंतु प्रबंधक सुरक्षितता / अभियांत्रीकी या पदावरुन सेवानिवृत्त झालेले श्री एम हारुण मनियार यांना मुख्य अग्निशमन अग्निशमन पदावर नेमणूक केली. महानगरपालिका च्या अग्निशमन दलात अग्निशमन दलाची शैक्षणिक अहर्ता व अनुभवी अनेक अधिकारी, जवान कार्यरत असतांना त्यांना डावलून सेवा निवृत्त झालेल्या विनाअनुभव धारकांला अग्निशमन दलाच्या प्रमुखाची जबाबदारी सोपऊन अकोल्यातील जनतेच्या जिवाशी सुरू असलेला खेळ त्वरित थांबऊन योग्य व्यक्तीला अग्निशमन दलाच्या प्रमुख पदाची जबाबदारी सोपवावी व तत्कालीन आयुक्त यांनी मो. हारुण मनियार यांची अकोला अग्निशामक विभाग प्रमुख पदावर नियुक्ती कोणत्या नियमानुसार केली याची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी. अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्यात येईल. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांनी विभागीय आयुक्त यांच्या कडे केलेल्या तक्रारी द्वारा केली आहे.