अकोला: देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत अकोला विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर त्यांच्या नियोजित हॉटेल जलसा येथील भाजपा प्रतिनिधी व पदाधिकार्यांना मार्गदर्शन व लोकसभा निवडणुकीच्या सहा जागांचा आढावा घेण्यासाठी त्यांचा ताफा रिधोरा नजीकच्या हॉटेलकडे मार्गस्थ झाला. अमित शहा यांचे अकोला येथील विमानतळावर अंदाजे 12:10 वाजण्याच्या सुमारास आगमन झाले. या वेळी महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शहा यांचे स्वागत केले. माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी अजित कुंभार, पोलीस अधिक्षक बच्चन सिंह आदी यावेळी उपस्थित होते.