• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 22, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

संत रोहिदास विकास महामंडळातर्फे ‘लिडकॉम’ आपल्या दारी

Our Media by Our Media
February 21, 2024
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
96 1
0
संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ शासनाच्या कर्ज योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन
14
SHARES
695
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.21 : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळातर्फे विविध प्रशिक्षण, तसेच व्यवसाय कर्ज योजना राबविण्यात येत आहेत. समाजातील युवक, महिला, तसेच पात्र व्यक्तींनी त्याचा लाभ घेऊन स्वयंविकास साधावा व सर्व गरजू व्यक्तींनाही या प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे केले.  संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष, तसेच ‘शासन आपल्या दारी’अंतर्गत ‘लिडकॉम आपल्या दारी’ कार्यशाळा नियोजनभवनात झाली, त्याच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. महामंडळाचे प्रदेश निरीक्षक गजानन भटकर, अग्रणी बँक व्यवस्थापक नयन सिन्हा, मधुकर वडनेरकर, प्रवीण चोपडे, रामाभाऊ उंबरकर, संज्योती मांगे, एच. जी. आत्राम, नीता अंभोरे, प्रसन्न रत्नपारखी, अरूण हेगडे, वर्षा खोब्रागडे आदी यावेळी उपस्थित होते.

महामंडळातर्फे चर्मकार समाजातील चांभार, ढोर, होलार, मोची आदी घटकांच्या  शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकासासाठी विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. गरजूंनी या योजनांचा लाभ घेऊन इतरांपर्यंतही त्याची माहिती पोहोचवावी. बाजारपेठेतील संधींचा शोध घेऊन त्यानुरूप प्रशिक्षण व उद्यमशीलता जोपासावी. महामंडळाच्या स्थानिक कार्यालयाच्या मागणीनुसार जागा आदी बाबींसाठी संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिका-यांनी दिली.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

विविध मान्यवरांनी या कार्यशाळेत राज्य व केंद्र शासनाच्या योजनांबाबत मार्गदर्शन केले. बीजभांडवल योजना व इतर योजनांच्या लाभाचे वितरण यावेळी जिल्हाधिका-यांच्या हस्ते करण्यात आले.  कार्यशाळेत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील महिला, युवक, व्यवसाय करण्यास इच्छूक व्यक्ती सहभागी झाल्या होत्या.

Previous Post

जिल्हा बाल संरक्षण कक्षाने बालविवाह रोखला

Next Post

बारावी परीक्षा केंद्रावर तोतया पोलीस बनून बहिणीला कॉपी द्यायला गेला सॅल्यूट ठोकताच बिंग फुटलं

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
12th &10th exam

बारावी परीक्षा केंद्रावर तोतया पोलीस बनून बहिणीला कॉपी द्यायला गेला सॅल्यूट ठोकताच बिंग फुटलं

अकोला येथे 10 मार्च रोजी ‘फिट अकोला’ मॅराथॉन स्पर्धा

अकोला येथे 10 मार्च रोजी ‘फिट अकोला’ मॅराथॉन स्पर्धा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.