• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

कर्ज आहे म्हणून पोटगी नाकारू शकत नाही पतीला न्यायालयाचा दणका

Our Media by Our Media
February 15, 2024
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, विदर्भ
Reading Time: 1 min read
97 1
0
Court
14
SHARES
699
VIEWS
FBWhatsappTelegram

पुणे : माझे उत्पन्न कमी आहे, माझ्यावर कर्जाचा डोंगर आहे, त्यामुळे मला पोटगी देणे शक्य होणार नाही, असे म्हणणार्‍या पतीला न्यायालयाने दणका दिला आहे. तुमच्यावर कर्ज आहे म्हणून तुम्ही पत्नीला पोटगी देण्याचे टाळू शकत नसल्याचे न्यायालयाच्या आदेशातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे न्यायालयाने पतीला उदरनिर्वाहाचे साधन नसलेल्या पत्नीला तीन हजारांची अंतरिम पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. एप्रिल 2023 पासून पतीला ही पोटगी पत्नीला द्यावी लागणार आहे. वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयाने हा आदेश दिला.

राहुल आणि स्नेहा (दोघांची नावे बदलली आहेत) या दोघांची परिस्थिती बेताचीच. त्याचे शिक्षण बी. कॉम.पर्यंत झाले आहे. लग्नानंतर स्नेहाचेही बी.कॉम.चे शिक्षण पूर्ण करण्याची तयारी त्याने दाखवली. त्यानुसार मे 2022 मध्ये ते दोघेही विवाह बंधनात अडकले. सासरी नांदत असताना स्नेहाच्या समोर संसारात भविष्यात बाधा ठरणार्‍या ’एक्स्ट्रा मॅरेटिअल अफेअर’ बाबत समजले. राहुलला याबाबत स्नेहाने विचारले असता त्याने लग्नापूर्वीचे प्रेम असल्याचे सांगितले. यावरून त्यांच्यात वाद निर्माण झाले. तिने त्यांच्या मोबाईलवरील चॅटिंगदेखील पाहिले. त्यामध्ये त्याने समोरील मुलीला ’तू माझं पहिलं प्रेम आहे… मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही…’ अशा आशयाचे मेसेज पाठविले होते. ते मेसेज स्नेहाने वाचले. त्याच्या हातावरील टॅट्यूनेही त्याचे लग्नापूर्वी प्रेमसंबंध असल्याचे तिचे मत ठाम झाले. त्यामुळे तिने त्याला विचारणा केल्यानंतर त्यांच्यात वाद झाले. पतीने तिला घरातून हाकलून दिले. अवघ्या दीड महिन्यात तिने माहेर गाठले. त्यानंतर दोन महिन्यांतच तिने अ‍ॅड. निखिल कुलकर्णी यांच्या मार्फत घटस्फोटासाठी न्यायालयात दावा दाखल केला. उदरनिर्वाहाचे साधन नसल्याने त्यांनी पोटगीचीही मागणी केली.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

दाव्यातील सर्व मुद्दे खोडण्यासाठी पतीने तिच्यावरच प्रत्यारोप केले. ती सोशल मीडियावर रिल्स बनविण्यात मग्न असते, सतत अपमान करते. माहेरी जाताना ती मोबाईल घेऊन गेल्याने माझी नोकरी गेली. माझ्यावर कर्ज असल्याने मी पोटगी देऊ शकत नसल्याचे म्हटले. मात्र, दोन्ही पक्षाच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने महिलेनी केलेला पोटगीचा अंतरिम अर्ज मंजूर करत तीन हजारांची पोटगी मंजूर केली.

Previous Post

जिल्हा कारागृहात बंदीजनांसाठी ई-किऑस्क मशिन सुविधा

Next Post

जेव्हा वाघानेच उचलले नदीतील प्लास्टिक!

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
जेव्हा वाघानेच उचलले नदीतील प्लास्टिक!

जेव्हा वाघानेच उचलले नदीतील प्लास्टिक!

नाफेड मार्फत तूर खरेदी;ऑनलाईन नोंदणी सुरु

डाळींचे महत्त्व ओळखा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.