अकोला: अकोला खदान पोलिस ठाणे हद्दीत दुचाकीने कोंबडी मृत झाल्याच्या कारणावरून दोघांमध्ये मारहाण झाल्याची घटना घडली. त्यानंतर दुचाकीवर बसलेल्या २५ वर्षीय युवतीचा विनयभंग केला. याप्रकरणी पोलिसांनी तक्रारीवरून दोन संशयितांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
एक तरुणी व तिचा भाऊ दुचाकीवरून अनिल पवार याच्या घरासमोरून जात असताना रघु पवार याने तरुणी व तिच्या भावास थांबवले. आणि तुमच्या दुचाकीमुळे माझी कोंबडी मृत पावली आहे, असे म्हणून शाब्दीक वाद घातला. व दुचाकीवरील तरुणीला रघु पवार याने मारहाण केली. तसेच हात धरून डोक्याचे केस ओढले व जीवे मारण्याची धमकी दिली, असे पोलिसांत दिलेल्या तक्रारी म्हटले आहे. तसेच काठीने तरुणीच्या भावाच्या पाठीवर व मानेवर मारहाण केली. या प्रकरणी अनिल पवार व रघू पवार यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.