अकोला,दि. १७: लोकशाहीतील मतदानाचे महत्वाचे पुढच्या पिढीच्या मनावर बिंबविण्यासाठी १४ वा राष्ट्रीय मतदार दिवस दि. २५ जानेवारी रोजी जिल्ह्यातील विविध शाळांतून साजरा करण्यात येणार आहे.
निवडणूक आयोगाकडून यंदाच्या मतदार दिनासाठी ‘नथिंग लाईक व्होटिंग, आय व्होट फॉर शुअर’ (मतदानासारखे दुसरे काही नाही, मी मतदान करणारच) ही थीम निश्चित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम विविध शाळांतून साजरा करण्यात यावा, अशी सूचनाही अकोला मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाकडून मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांना, तसेच शाळांना करण्यात आली आहे. यानिमित्त थीमवर आधारित चित्रकला स्पर्धाही शाळांमध्ये घेतली जाणार आहे. स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना निवडणूक कार्यालयाकडून प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे.