अकोला,दि.15 : सखी वन स्टॉप सेंटर येथे राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीदिनानिमित्त शुक्रवारी महिला जागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सेंटर व परिचर्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी, तसेच एन्करेज फाऊंडेशनतर्फे महिला सक्षमीकरणाबाबत पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले.
बालकल्याण समितीच्या अध्यक्ष ॲड. अनिता गुरव, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर, अकोला बार असोसिएशनच्या उपाध्यक्ष ॲड. अरूणा गुल्हाने यांनी यावेळी मार्गदर्शन केले. सेंटरच्या व्यवस्थापन समिती सदस्य सुषमा शुक्ला, निशा ग्यारल, बालकल्याण समिती सदस्य प्रांजली जयस्वाल, ॲड. शीला तोष्णीवाल, जिल्हा बाल संरक्षण कक्ष अधिकारी राजू लाडूलकर, ॲड. सरिता सदार आदी उपस्थित होते. प्रिया इंगळे यांनी प्रास्ताविक केले. ॲड. मनीषा भोरे यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. राखी वर्मा यांनी आभार मानले.