हिवरखेड :- हिवरखेड येथील ग्रामपंचायत ते मेडिकल लाईन पर्यत मोठा उहापोह करून मोठ्या निधी मधून या रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. बांधकाम करतांना रस्त्यावरील अतिक्रमण सुद्धा हटविले होते. रस्त्याचे उदघाटन करतांना मोठा गाजावाजा सुद्धा करण्यात आला. व काही दिवसांतच रस्त्याचे काम पूर्ण केले मात्र काही दिवसातच रस्ता उखडल्याचे चित्र जनतेसमोर उघडे झाले. व उघड्या डोळ्यांनी हे चित्र तमाम जनता बघत आहे, याच रस्त्याच्या बाजूला मेनरोड वर माजी जिल्हा परिषद अध्यक्षा यांच्या कार्यकाळात हिवरखेड चंडिका चौक ते हिवरखेड गोर्धी वेस पर्यंत सदर रस्त्याचे मेंनरोडचे बांधकाम करण्यात आले. या रस्त्याला १० ते १५ वर्षे पूर्ण होत असतानाही अजूनही हा मेनरोड ठीक ठाक दिसतो मात्र आता नव्यानेच तयार झालेला रस्ता ज्यांच्या कार्यकाळात बांधला तो रस्ता बांधून काही दिवस झाले नाहीत आणि रस्ता उखडला, रस्त्यावरील गिट्टी उघडी पडली. या रस्त्याला भरपूर निधि आला होता मग हा रस्ता असा कसा उखडला? हा रस्ता उखडण्या मागे काय कारणे आहेत? काही मोठी गडबड तर नाही झाली ना? असे अनेक प्रश्न, चर्चा, तर्क वितर्क, नागरिकांना पडले, हा रस्ता एवढ्या लवकर कसा उखडला या रस्त्या समोरच जुना रस्ता असून तो अजून जैसे चे तैसे आहे, मग या रस्त्यात नेमका काय घोळ झाला? याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी हिंमतीने चौकशी करावी. आणि दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सुजान नागरिक करीत आहेत.
रस्त्यावर रस्ता तरीही बोगस अन खस्ता
छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले गड आणि किल्ले साडेतीनशे वर्षानंतर अजूनही सुस्थितीत असताना आता आधुनिक तंत्रज्ञान आले असतानाही एकीकडे रस्त्याचे काम चालू असताना दुसरीकडे रस्ता उखडतो यामध्ये किती मोठा घोळ होत असेल. असा साहजिक प्रश्न जनतेला पडतो. विशेष म्हणजे हा रस्ता आधीच्या सिमेंट काँक्रीट रोडवरच पुन्हा बनविण्यात आला. त्यामुळे याच्या खाली कोणतेही बोल्डर मुरूम अथवा भरती टाकून दबाई करावी लागले नाही. फक्त सिमेंट काँक्रेट चा नवीन माल आथरावा लागला. तरीपण हा रस्ता तात्काळ उखडल्याने याच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून यावर लक्षावधी रुपयाचा खर्च करण्यात आला. यामध्ये कोणी कोणी हात धुतले. याबाबत जनतेमध्ये तर्कवितर्क लावल्या जात आहेत