अकोला,दि.13: औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अकोला व सुझुकी मोटर्स, गुजरात, प्रा. लि. यांचे संयुक्त विद्यमाने 22 डीसेंबर रोजी सकाळी 9 वाजता शासकीयऔद्योगिक प्रशिक्षण संस्था, रतनलाल प्लॉट, अकोला येथे रोजगार भरती मेळावाआयोजित केलेला आहे. यामध्ये फीटर, टर्नर, वेल्डर, इलेक्ट्रीशियन, डीझेल मेकॅनिक, पेन्टरजनरल, मशिनिष्ट, मोटारमेकॅनिक, टुल आणि डायमेकर, पि. पि. ओ., ट्रॅक्टरमेकॅनिक, सि. ओ. ई. ऑटोमोबाईल या व्यवसायातील आय. टी. आय. उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांना संबंधित कंपनी मार्फत रोजगार देण्यात येणार आहेत. इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांनी रोजगार मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आले अधिक माहितीसाठी कार्यालयास भेट देण्यात यावी असे सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केन्द्र व्दारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था,अकोला यांनी कळविले आहे.