• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 6, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

निवडणूक विषयक कामकाजाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

Our Media by Our Media
December 1, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
82 1
0
जिल्ह्यात ‘चला जाणूया नदीला’ अभियान प्रभावीपणे राबवा – जिल्हाधिकारी अजित कुंभार
12
SHARES
590
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि. १ : अद्यापपर्यंत मतदार म्हणून नोंदणी न झालेल्या सर्व व्यक्तींची नोंदणी आगामी शिबिरांच्या माध्यमातून करावी, तसेच आगामी निवडणूक लक्षात घेता सर्व नोडल अधिका-यांनी आवश्यक पूर्वतयारी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले. निवडणूकीच्या अनुषंगाने नोडल अधिका-यांची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, उपजिल्हाधिकारी विजय पाटील, अनिल माचेवाड, डॉ. शरद जावळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, महिला व बालविकास अधिकारी राजश्री कोलखेडे, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, जिल्हा माहितीविज्ञान अधिकारी अनिल चिंचोले आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, जिल्ह्यातील एकही पात्र व्यक्ती मतदार म्हणून नोंदणी झाल्याशिवाय राहू नये. त्यासाठी विविध घटकांपर्यंत पोहोचून नोंदणी होऊ न शकलेल्या व्यक्तींची नोंदणी करावी. महिला बचत गटांच्या माध्यमातून महिला मतदार, त्याचप्रमाणे, शिक्षणाधिकारी व महाविद्यालयांच्या माध्यमातून नवीन मतदारांपर्यंत पोहोचून अधिकाधिक नोंदणी करावी. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने नियुक्त नोडल अधिका-यांनी निवडणूक आयोगाच्या हँडबुक, मॅन्युअल, मॉडेल चेकलिस्ट आदींचा अभ्यास करून आवश्यक पूर्वतयारी करावी, असेही निर्देश त्यांनी दिले. निवडणूकीसाठी विषयनिहाय नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यात ‘स्वीप’ची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांच्याकडे, तर कायदा व सुव्यवस्था, सिक्युरिटी प्लॅन, आदर्श आचारसंहिता कक्ष आदी जबाबदारी अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

मनुष्यबळ, प्रशिक्षण व वाहतूक व्यवस्थापनाची जबाबदारी निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांच्याकडे, साहित्य व्यवस्थापनाची जबाबदारी श्री. माचेवाड यांच्याकडे, संगणकीकरण, सायबर सुरक्षितता, कम्युनिकेशन प्लॅन, वोटर हेल्पलाईन व माहिती तंत्रज्ञान आदी जबाबदारी माहितीविज्ञान अधिकारी श्री. चिंचोले यांच्याकडे व ईव्हीएम व्यवस्थापनाची जबाबदारी उपविभागीय अधिकारी शरद जावळे यांच्याकडे देण्यात आली आहे. खर्च सनियंत्रणाची जबाबदारी प्र. कॅफो योगेश धोंगडे यांच्याकडे, बॅलट पेपर, पोस्टल बॅलेट आदी जबाबदारी खनिकर्म अधिकारी प्रणिता चापले यांच्याकडे, ॲक्सेसिबिलिटी नोडल अधिकारी म्हणून श्रीमती कोलखेडे, माध्यम नोडल अधिकारी म्हणून श्री. पवार व निरीक्षकांसाठी नोडल अधिकारी म्हणून कृषी अधिक्षक श्री. किरवे यांना नेमण्यात आले आहे.

Previous Post

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर

Next Post

गावरानपेक्षा लाल कांदाच खातोय भाव !

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
onion

गावरानपेक्षा लाल कांदाच खातोय भाव !

हिवाळी अधिवेशनासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे नागपुरात आगमन

हिवाळी अधिवेशनासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे नागपुरात आगमन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.