• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 16, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

राजकीय पक्ष प्रतिनिधींशी चर्चा मतदान केंद्रांना भेट मतदार यादी निरीक्षक डॉ. निधी पाण्डेय यांच्याकडून कामकाजाचा आढावा

Our Media by Our Media
November 29, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
92 1
0
राजकीय पक्ष प्रतिनिधींशी चर्चा मतदान केंद्रांना भेट मतदार यादी निरीक्षक डॉ. निधी पाण्डेय यांच्याकडून कामकाजाचा आढावा
13
SHARES
664
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि. २९ : मतदार यादी अधिकाधिक गुणवत्तापूर्ण व अचूक व्हावी. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व कार्यवाही विहित मुदतीत व्हावी, असे निर्देश मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज येथे दिले. मतदार यादीविषयक कामकाजाचा आढावा घेण्यासाठी बैठक डॉ. पांडेय यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही सभागृहात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी अजित कुंभार, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, मतदार यादी निरीक्षकांचे समन्वय अधिकारी तथा उपायुक्त श्यामकांत म्हस्के, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार उपस्थित होते.

यावेळी मतदार यादी निरीक्षकांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. मतदाराच्या नावाची एकाहून अधिक नोंद असणे, मयत मतदाराचे नाव यादीत असणे, एकाच मतदाराचे दोन मतदारसंघात नाव असणे आदी त्रुटी व आक्षेपांबाबत दावे-हरकती आदी कार्यवाही विहित वेळेत पूर्ण करावी. सर्व पक्ष प्रतिनिधींना यादी, तसेच आवश्यक माहिती वेळेत उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश मतदार यादी निरीक्षक डॉ. पाण्डेय यांनी दिले. मतदार यादीबाबत काही म्हणणे असल्यास भ्रमणध्वनी क्र. 9209181138 वर तक्रार नोंदवावी, असे आवाहन डॉ. पाण्डेय यांनी यावेळी केले.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी सादरीकरण केले. एकाहून अधिक नोंदी असलेल्या किंवा मयत नावांच्या वगळणीची कार्यवाही विहित वेळेत पूर्ण होईल. जिल्ह्यात ‘स्वीप’ कार्यक्रमात नवमतदारांसाठी ७०, सर्व वयोगटासाठी ७, भटक्या विमुक्त जमातीसाठी १२, दिव्यांगांसाठी ३, तृतीयपंथीसाठी ३ विशेष शिबिरे घेण्यात आली. सार्वजनिक उत्सवांच्या ठिकाणीही शिबिरे घेण्यात आली. अशा एकूण १७८ शिबिरांचे आयोजन करून ५ हजार ७९२ फॉर्म गोळा करण्यात आले. त्याशिवाय, मतदार जनजागृती गीत, दोन मोबाईल व्हॅन, सायकल रॅली, महापालिका व नगरपरिषदांच्या एकूण १२० घंटागाड्या, ठिकठिकाणी फलक आदींद्वारे जनजागृती करण्यात आली, अशी माहिती  जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी दिली.

रिधोरा येथील मतदान केंद्राला भेट मतदार यादी निरीक्षक डॉ. पाण्डेय यांनी जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांच्यासह रिधोरा येथील जि. प. प्राथमिक शाळेला भेट देऊन तेथील तीन केंद्रांची पाहणी केली. मतदान केंद्रांची रचना, तेथील सुरक्षितता, मतदारांसाठी, तसेच दिव्यांग मतदारांशी आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांशी त्यांनी चर्चा केली  व माहिती घेतली. समन्वय अधिकारी श्री. म्हस्के, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पी. बी. धोटे, सुधीर बचे, किशोर पुंडे, पर्यवेक्षक गजानन इंगळे आदी उपस्थित होते. यावेळी शाळेच्या विद्यार्थिनींनी विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांचे स्वागत केले. आयुक्तांनी यावेळी विद्यार्थिनींशी संवाद साधला.

Previous Post

आजपासून 3 दिवस मोठ्या पावसाचा अंदाज

Next Post

अवकाळीग्रस्तांना नुकसानभरपाई ते अल्पसंख्याक महामंडळासाठी शासन हमी

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
गाव-खेड्यातील सर्व अतिक्रमणं नियमित होणार, सरकारचा मोठा निर्णय

अवकाळीग्रस्तांना नुकसानभरपाई ते अल्पसंख्याक महामंडळासाठी शासन हमी

जिल्हाधिकाऱ्यांकडून नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी

जिल्हाधिकाऱ्यांकडून नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.