• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 22, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अमरावती – कुरणखेड – शेळद महामार्गाचे लोकार्पण जिल्ह्यात महत्वाच्या पुलांसाठी तीनशे कोटींचा निधी

Our Media by Our Media
November 23, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
853 8
0
अमरावती – कुरणखेड – शेळद महामार्गाचे लोकार्पण जिल्ह्यात महत्वाच्या पुलांसाठी तीनशे कोटींचा निधी
169
SHARES
6.2k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.२३ : जिल्ह्यात शेगाव- देवरी फाटा मार्गावर पूर्णा नदीवर मोठ्या पुलासाठी १०० कोटी, बार्शीटाकळी येथील रेल्वे उड्डाण पुलासाठी १३५ कोटी, तसेच अकोला-अकोट- गांधीग्राम रस्त्यावर पूर्णा नदीवर पुलासाठी ७० कोटी रू. निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज मूर्तिजापूर येथे केली. अकोट- अकोला रस्त्याचे काम तीन ते चार महिन्यात पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांच्या हस्ते अमरावती- कुरणखेड- शेळद महामार्गाचे लोकार्पण व कारंजा- खेर्डा- मूर्तिजापूर या चौपदरी महामार्गाचे भूमिपूजन झाले, त्यावेळी ते बोलत होते. खासदार डॉ. अनिल बोंडे,  भावना गवळी, आमदार रणधीर सावरकर, प्रकाश भारसाकळे, हरिश पिंपळे, प्रताप अडसड, वसंत खंडेलवाल, राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी अजित कुंभार आदी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले की, अकोट- अकोला रस्त्याच्या विकासातील सर्व अडचणी दूर करून हा रस्ता तीन-चार महिन्यात पूर्ण केला जाईल. चौपदरी महामार्ग विक्रमी वेळेत पूर्ण झाला. कोलकात्यापासून गुजरातपर्यंत विविध मार्गांशी हा महामार्ग जोडलेला आहे. एकूण सात हजार कोटी रू. निधीतून रस्तेविकासाला चालना मिळाली आहे. दळणवळणाची उत्तम सुविधा निर्माण झाल्याने उद्योग, व्यापाराबरोबरच शेतीविकासालाही गती मिळेल.

कृषी क्षेत्रात बदल घडविण्यासाठी सिंचन, पशुधन व पूरक व्यवसायांचा विकास आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, शेतीविकासासाठी पाण्याची साठवणूक होणे आवश्यक आहे. वाशिम जिल्ह्यात नदी खोलीकरण व जलसंधारणाची कामे व्यापक स्वरूपात व्हावीत. आवश्यक तिथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सहकार्य केले जाईल. विदर्भात ‘मदर डेअरी’च्या माध्यमातून दुग्धव्यवसाय विकास, खारपाणपट्ट्यात झिंगे संवर्धनाचा व्यवसाय विकसित करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. शेतकरी बांधवांनी अशा पूरक व्यवसायांकडे वळावे. विदर्भात पशुखाद्य निर्मितीचे ४० कारखाने निर्माण करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.

खासदार डॉ. बोंडे, श्रीमती गवळी, आमदार श्री. सावरकर,श्री. पिंपळे, श्री. भारसाकळे, श्री. पाटणी, श्री. अडसड आदींनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी श्री. गडकरी यांच्या हस्ते विक्रमी वेळेत महामार्ग पूर्ण करणाऱ्या अभियंता, तंत्रज्ञ, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अमरावती – चिखली पॅकेज एकमध्ये ९१२.४१ कोटी निधीतून राष्ट्रीय महामार्गावरील अमरावती ते कुरणखेड या ५४ किमी लांबीचा रस्ता, तसेच पॅकेज दोनमध्ये  ८१७.३५ कोटी रू. निधीतून कुरणखेड ते शेळद हा ५० किमी लांबीचा रस्ता विक्रमी वेळेत निर्माण करण्यात आला आहे. या संपूर्ण कामांचे निर्मिती मूल्य १७२९.७६  कोटी रू. आहे. त्याचप्रमाणे, कारंजा- खेर्डा- मूर्तिजापूर या २६.०८ कि. मी. रस्ता निर्माण करण्यासाठी ५९४.४४ कोटी रू.  निधीची तरतूद आहे.

Previous Post

जिल्ह्यात ‘विकसीत भारत संकल्प यात्रेचा’ शुभारंभ

Next Post

आजपासून 3 दिवस मोठ्या पावसाचा अंदाज

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
bad-weather

आजपासून 3 दिवस मोठ्या पावसाचा अंदाज

राजकीय पक्ष प्रतिनिधींशी चर्चा मतदान केंद्रांना भेट मतदार यादी निरीक्षक डॉ. निधी पाण्डेय यांच्याकडून कामकाजाचा आढावा

राजकीय पक्ष प्रतिनिधींशी चर्चा मतदान केंद्रांना भेट मतदार यादी निरीक्षक डॉ. निधी पाण्डेय यांच्याकडून कामकाजाचा आढावा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.