अकोला दि.9 : जिल्ह्यातील वाहनधारकांनी वाहनांची प्रदुषण नियंत्रण तपासणी करून घ्यावी. तसे प्रमाणपत्र नसल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी दिला आहे.
केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 115 व 116 मधील तरतुदीनुसार मान्यताप्राप्त वायु प्रदुषण तपासणी केंद्राकडून वाहनाची वायु प्रदुषण तपासणी करून वाहनाला प्रमाणपत्र देण्याविषयी तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार वाहनधारकांनी आपल्या वाहनाची वायू प्रदुषण तपासणी करून घ्यावी अन्यथा प्रमाणपत्र नसणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा श्रीमती दुतोंडे यांनी दिला.