पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (दि.२५ सप्टेंबर) नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले. केंद्र सरकारच्या विविध विभागांमधील ५१ हजार पदांसाठी नियुक्त ५१ हजार जणांना आजच्या रोजगार मेळाव्यात नियुक्तीपत्रे देण्यात आली. पीएम मोदींच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले.
महिला आरक्षण विधेयकामुळे महिलांना मोठी ताकद मिळाली
‘रोजगार मेळाव्यात आज नियुक्तीपत्रे मिळालेल्या सर्व नव्याने नियुक्ती झालेल्यांचे पीएम मोदींनी अभिनंदन केले. नवीन नियुक्त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले, संसदेच्या नव्या इमारतीपासून देशाच्या नव्या भविष्याची सुरुवात होत आहे. तसेच महिलांसाठी नवीन दरवाजे उघडण्याचे सरकारचे धोरण आहे.आपला देश ऐतिहासिक कामगिरी आणि निर्णयांचे साक्षीदार आहे. काही दिवसांपूर्वी, देशाच्या अर्ध्या लोकसंख्येला ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’च्या (महिला आरक्षण विधेयक) रूपाने महिलांना मोठी ताकद मिळाली असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.