मुसळधार पावसामुळे नागपूर शहरातील सखल भागात हाहा:कार माजला आहे. आज (दि.२३) दुपारपर्यंत पुराच्या पाण्यात अडकलेल्या ३४९ नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्याचबरोबर भंडारा जिल्ह्यात चौथ्या दिवशीही पावसाची संततधार सुरूच आहे. प्रादेशिक हवामान विभाग नागपूरने विदर्भातील पुढील पाच दिवसांसाठी पावसाची काय स्थिती असणार आहे याबबत माहिती दिली आहे. जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट आहे.
नागपूरला आज ऑरेंज अलर्ट
या दोन दिवशी विदर्भाला ‘यलो अलर्ट’
३४९ नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश
मुसळधार पावसामुळे नागपूर शहरातील सखल भागात हाहाकार माजला आहे. आज (दि.२३) दुपारपर्यंत पुराच्या पाण्यात अडकलेल्या ३४९ नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. सकाळपासून पावसाने उघडीप दिल्याने मदत कार्याला वेग आला आहे. नागपूरमध्ये ‘एसडीआरएफ’च्या २ तुकड्या ७ गटात विभागण्यात आल्या आहेत. सखल भागातील नागरिकांना बाहेर काढले जात आहे. आतापर्यंत एनडीआरएफ आणि एसडीआरएफ टीमने ३४९ नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले आहे. मूक-बधीर विद्यालयातील 40 विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.