अकोला, दि. 28 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातर्फे पारधी समाजाच्या मुलांसाठी 4 पारधी वस्त्यांवर बालसंस्कार केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. मूर्तिजापूर तालुक्यातील मधापुरी, माना व कुरूम, तसेच अकोट तालुक्यातील महागाव येथील वस्तीवर पारधी समाजाच्या मुलांसाठी बालसंस्कार केंद्रे सुरू करण्यात येतील. जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमातील निधीतून हा उपक्रम राबवला जाईल.
त्यासाठी बालसंस्कार केंद्र चालविण्यासाठी इच्छूक असलेल्या स्वयंसेवी संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. केंद्रावर किमान 20 बालके असणे आवश्यक आहे. योजनेचा नमुना अर्ज प्रकल्प कार्यालयात विनामूल्य उपलब्ध असून, दि. 8 सप्टेंबरपूर्वी नोंदणी प्रमाणपत्र, संस्थेची घटना, तीन वर्षांचा ऑडिट रिपोर्ट, अनुभव आदी सर्व कागदपत्रांसह दाखल करणे आवश्यक आहे.
पारधी समाजबांधवांना शेळीपालनासाठी अर्थसाह्य
पारधी, फासेपारधी समाजाच्या 40 लाभार्थ्यांना शेळीपालनात पाच शेळी व एक बोकड खरेदी करण्यासाठी 100 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, 40 महिला लाभार्थ्यांना मणीमाळ व्यवसाय करण्यासाठी 100 टक्के अनुदानावर अर्थसाह्य करण्यात येणार आहे. त्यासाठी जात प्रमाणपत्र, आधारपत्र, बँक तपशील, दारिद्य्ररेषेखाली असल्याचे प्रमाणपत्र किंवा उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी दाखला, शिधापत्रिका, विधवा महिला असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र, दिव्यांग, परितक्त्या असल्यास दाखला, शाळा सोडल्याचा दाखला व पासपोर्ट आकारातील फोटोसह अर्ज दि. 15 सप्टेंबरपूर्वी दाखल करावा. योजनेचे अर्ज प्रकल्प कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत.