नवी दिल्ली : क्लायमेट चेंज म्हणजेच हवामान बदलाचा परिणाम आपल्या आयुर्मानावरही होत आहे असे संशोधकांनी म्हटले आहे. हवामान बदलामुळे जगभर वेगवेगळ्या आजारांचा धोका वाढत आहे. एक शतकापूर्वी लोक दीर्घायुष्य जगत होते. मात्र, आता तशी स्थिती राहिलेली नाही.
अमेरिकन मासिक ‘ग्रीस्ट’ने दिलेल्या माहितीनुसार हवामान बदल माणसाचे आयुष्य हिरावून घेत आहे. वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे जागतिक तापमानवाढही वेगाने होत आहे. पृथ्वी उष्ण होत चालली आहे. आता प्राणीही हवामान बदलाचे कारण बनत चालले आहेत.
माणसांनी विकासाच्या नावाखाली जंगले कापून तिथे घरे व कारखाने उभे केले. त्यामुळे आपला विविध प्राणी, डास, जीवाणू, बुरशी यांच्याशी संपर्क वाढला. दुसरीकडे हे जीवजंतूही स्वतःला बदलत्या हवामान स्थितीशी अनुकूल होऊ लागले आहेत आणि आपल्याच वातावरणात राहत आहेत. त्यामुळे अनेक आजार फैलावत आहेत, जे आपल्या जीवनासाठी धोकादायक आहेत.