पुणे : राज्यातून गेल्या काही दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने चिंता वाढली आहे. मात्र, पुढील पाच दिवस केवळ हलका पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, पाऊस कमी झाल्यामुळे कमाल तापमानात वाढ झाली असल्याचे दिसून आले. राज्यातून गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे नागरिकांसह शेतकरी चिंतेत आहेत.
राज्यातील विविध भागांत पावसाने गेल्या दोन ते अडीच महिन्यांत अतिशय कमी पाऊस पडला आहे. मोठ्या आणि सलग पावसाची गरज आहे. मात्र, बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात पाऊस पडण्यास पोषक वातावरण नाही. त्यामुळे पावसाने आखडता हात घेतला आहे. पुढील पाच दिवस राज्याच्या सर्वच भागांत हलका पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.