• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, June 19, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

राज्यात ‘कांदा महाबँक’ संकल्पना राबवणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Our Media by Our Media
August 22, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ, शेती
Reading Time: 1 min read
87 1
0
एकनाथ शिंदे
13
SHARES
630
VIEWS
FBWhatsappTelegram

कांद्याची साठवणूक वाढविण्यासाठी राज्यात ‘कांदा महाबँक’ ही संकल्पना राबवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. अनिल काकोडकर समितीच्या शिफारशींवर काम सुरू आहे. राज्यात १३ ठिकाणी कृषि समृद्धी प्रकल्प उभे राहत आहेत. त्यामध्ये रब्बी कांद्यासाठी दहा लाख टन इतकी साठवणूक क्षमता उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे ६० हजार पेक्षा जास्त रोजगार निर्माण होऊ शकतात, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितेल. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केंद्र सरकारने दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांचे आभार मानले. ते म्हणाले की, “गृहमंत्री शहा आणि पियूष गोयल यांच्याशी आज चर्चा झाली. केंद्राकडून २ लाख हेक्टर टन कांदा खरेदी केला जाणार आहे. पण गरज भासल्यास आणखी कांदा खरेदी करण्याची खात्री त्यांनी दिली आहे. राज्यसरकारच्यावतीने त्यांना धन्यवाद देतो. सरकारने आजपर्यंत शेतकऱ्याला कधीही वाऱ्यावर सोडलेलं नाही. कांद्याबाबत ऐतिहासिक असा निर्णय पहिल्यांदाच घेतला आहे. भविष्यातही अडचण आली तर केंद्र सरकार खंबीरपणे शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, “कांद्याची साठवणूक कशी वाढविता येईल याबाबत आज चर्चा झाली आहे. कांदा चाळी वाढवणे त्याचे अनुदान वाढवणे तसेच फूड स्टोरेज वाढवण्याबाबत लवकरच शासनस्तरावर निर्णय घेण्यात येईल. यासाठी खासगी कंपन्यांची गरज लागली तर घेतली जाईल. शेतकऱ्यांसाठी ‘कांद्याची महाबँक’ ही संकल्पना राबवणार आहे. डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने दिलेल्या सुचनांवर काम सुरू आहे. राज्यात १३ ठिकाणी कृषि समृद्धी प्रकल्प उभे राहत आहेत. त्यामध्ये रब्बी कांद्यासाठी दहा लाख टन इतकी साठवणूक क्षमता उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या मदतीला धावून गेले आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

कांद्याच्या मुद्द्यावर राजकारण नको

केंद्रसरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे यामध्ये राजकारण करू नये. शरद पवार मोठे नेते आहेत, ते १० वर्ष कृषिमंत्री होते. त्या काळातही कांद्याची अशी परिस्थीती निर्माण झाली होती. पण तेव्हा असा निर्णय घेतला नाही. मात्र आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर संकट आलं तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. यामध्ये राजकारण करू नये. त्यांनी या निर्णयाचे स्वागत करावं, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.

Previous Post

तलाठी परिक्षा असलेल्या काही केंद्रांवर सर्व्हर डाऊन लाखो परीक्षार्थी खोळंबले

Next Post

प्रवाशाच्या बॅगेत सापडले तब्बल २४ कोटींचे अंमली पदार्थ

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
drugs

प्रवाशाच्या बॅगेत सापडले तब्बल २४ कोटींचे अंमली पदार्थ

post office

पोस्टाच्या निवृत्तीधारकांसाठी सप्टेंबरमध्ये पेंशन अदालत

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.