• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 1, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पौष्टिक, रुचकर रानभाज्यांना वाढती मागणी विविध आजारांवर उपयुक्त

Our Media by Our Media
August 4, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, आरोग्य, ठळक बातम्या, बातम्या आणि कार्यक्रम, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
111 1
0
पौष्टिक, रुचकर रानभाज्यांना वाढती मागणी विविध आजारांवर उपयुक्त
16
SHARES
798
VIEWS
FBWhatsappTelegram

पुणे : कोरोना महामारीनंतर पौष्टिक व आरोग्यदायक आहाराचे महत्त्व खूपच वाढले आहे. लोक आपल्या पारंपरिक जीवनशैलीकडे वळू लागले आहेत. याचमुळे लोकांकडून श्रावणात मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार्‍या पौष्टिक, रुचकर आणि आरोग्यदायक रानभाज्यांची मागणी वाढत चालली आहे. पुणे जिल्ह्यात खेड, आंबेगाव, जुन्नर या निसर्गरम्य तालुक्यांत पश्चिम पट्ट्यात सध्या मुबलक प्रमाणात रानभाज्या उपलब्ध आहेत.

सह्याद्रीच्या घाटात दर वर्षी पावसाळ्यात विविध रानभाज्या उगवतात. पावसाळी हवामानात वाढणार्‍या या भाज्या अतिशय पौष्टिक, औषधी व चविष्ट असतात. रानभाज्यांविषयी अनेकांना कुतूहल व खाण्याची उत्सुकता असते. मात्र, या भाज्यांची अनेकांना माहिती नसते.
पावसाळ्यात रानात, शेताच्या बांधावर, माळरानावर, झुडपांमध्ये या रानभाज्या उगवतात. यामध्ये कंद, फूल, फळ, शेंगभाज्या, बियांपासून तयार होणार्‍या अशा विविध प्रकारच्या भाज्या आहेत. आदिवासींना याची चांगली माहिती असते. ते रानात फिरून भाज्या गोळा करतात. यामुळे त्यांच्या आरोग्याला फायदा होतोच याहीपेक्षा निसर्गाशी त्यांची नाळ जुळून राहते. काही ठिकाणी डोंगराळ भागात राहणारे लोक या भाज्या गोळा करतात आणि जवळच्या बाजारपेठेत विकतात.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

रानभाज्यांची माहिती पुढीलप्रमाणे

  • म्हैसवेलाची पाने : वेल वर्गातील या भाजीच्या पानांची भाजी केली जाते. म्हशीच्या तोंडासारखा पानांचा आकार असल्याने त्याला म्हैसवेलाची पाने म्हणतात. अळूच्या वड्या जशा बनवल्या जातात, तशाच या पानांच्या वड्या करून खाल्ल्या जातात किंवा सुकी भाजीदेखील बनवली जाते.
  • चाव्याचा बार : चाव्याच्या वेलाला नंतर फुले येतात. या फुलांची भाजी बनवली जाते. छोट्या अंड्यांप्रमाणे ही फुले असतात. हिरवी मिरची व कांद्यामध्ये परतून याची भाजी केली जाते. ही भाजी अतिशय औषधी असून स्वादिष्ट लागते.

पौष्टिक, रुचकर रानभाज्यांना वाढती मागणी

  • चिचारडी : पित्तावर अतिशय गुणकारी असणारी ही भाजी अतिशय कडवट असते. चिचारडीचे झाड काटेरी असते. झुडपांमध्ये ही झाडे उगवतात. चिचारडी काढताना खूप काटे टोचतात. चिचुरडी ठेवून, पाण्यात उकळून पिळून घेऊन मग भाजी केली जाते.
  • कवदर : डोंगराच्या कातळ दगडामध्ये रानकेळी उगवतात. या रानकेळींवर सुरुवातीला येणार्‍या कोवळ्या केगाला कवदर म्हणतात. या कोवळ्या केंगामधील कोंबडा काढून टाकावा लागतो व नंतर त्याची भाजी केली जाते. याची भाजी अतिशय स्वादिष्ट लागते.
  • रुखाळू : अळूच्या पानांसारखे असणारे रुखाळू उंबर, आंबा, सागाच्या झाडांवर खोडामध्ये उगवतात. नुसते पान खाल्ले तर तोंडात प्रचंड चुणचुण होते. यासाठी चिंचगुळामध्ये ही भाजी बनवली जाते.
    भारिंग: भारिंग याच्या फुलांची व कोवळ्या पानांची भाजी केली जाते. साधारण कडवट लागणारी ही भाजी कांदा-लसूण टाकून परतून केली जाते.
  • चाव्याचे कवळे : पाऊस पडल्याबरोबर चाव्याचे वेल उगवतात. या उगवलेल्या वेलाचे कोवळे कोंब तोडून त्याची भाजी केली जाते. हे कोंब कांद्याच्या पातीसारखे कापून त्यांची भाजी बनवली जाते.
  • करटुली : वेलाला येणारी करटुली करल्यासारखी काटेरी असतात. याची भाजी कारल्यासारखीच मसाला लावून रस्सा अथवा कोरडी बनवतात. मधुमेह व रक्ताशी निगडित आजार असल्यास ही भाजी खाल्ली जाते.
  • करंद : ही भाजी कंद वर्गातील असून रताळे, बटाट्यासारखी असते. याचा कंद लाल रंगाचा असतो. ही भाजी उपवासाला खाल्ली जाते व बनवण्याची पध्दतदेखील बटाट्याच्या तसेच रताळ्याच्या सारखीच आहे. दम्यासाठी ही गुणकारी मानली जाते.

रानतोंडली, तेरा, तांदुळजा

रानभाज्या मधुमेह, पोटदुखी, खोकला, वात आदी आजारांवर उपयुक्त आहेत. याचबरोबर कंद वर्गातील हाळिंद, खरबुडी, तर फळ वर्गातील रानकेळी, मिकी, रानतोंडली, पालेभाज्यांमध्ये कोळू आघाड्याची पाने, तेरा, तांदुळजा, फांदी, शेवाळे, हादगा, रानभेंडी, बांबूचे कोवळे कोंब, भोपळ्याची कोवळी फुले यांच्यादेखील भाज्या केल्या जातात.

Previous Post

राज्यपाल रमेश बैस यांचे रेल्वे स्थानकावर स्वागत

Next Post

‘हर घर तिरंगा’ मोहिमेसाठी टपाल कार्यालयात राष्ट्रध्वज उपलब्ध

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
‘हर घर तिरंगा’ मोहिमेसाठी टपाल कार्यालयात राष्ट्रध्वज उपलब्ध

‘हर घर तिरंगा’ मोहिमेसाठी टपाल कार्यालयात राष्ट्रध्वज उपलब्ध

अकोला जिल्हाधिकारीपदी अजित कुंभार रूजू

मेरी माटी मेरा देश : सन्मान शूरवीरांचा ‘मेरी माटी मेरा देश’ मोहिमेत अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे - जिल्हाधिकारी अजित कुंभार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.