• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 28, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

एमपीएससी प्रवेश परीक्षा घेणाऱ्या एजन्सीचा कार्यादेश रद्द! महाज्योतीचा मोठा निर्णय

Our Media by Our Media
August 3, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, शिक्षण
Reading Time: 1 min read
86 1
0
युपीएससी पूर्व प्रशिक्षणासाठी महाज्योती घेणार पुन्हा प्रवेश परीक्षा
12
SHARES
621
VIEWS
FBWhatsappTelegram

नागपूर : परीक्षा घेणाऱ्या एजन्सीने केलेल्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. तसेच त्यांचे आर्थिक नुकसान आणि वेळेचा अपव्यय झाल्याची बाब लक्षात घेता महाज्योतीने परीक्षा घेणाऱ्या एजन्सीचा कार्यादेश रद्द केला आहे. त्यामुळे या प्रवेश परीक्षा पुन्हा नव्याने घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाज्योतीने यूपीएससी तसेच एमपीएससी प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्याकरिता एका परीक्षा एजन्सीद्वारे अनुक्रमे 16 जुलै 2023 व 30 जुलै 2023 रोजी महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रांवरती प्रवेश परीक्षा आयोजित केली होती.

16 जुलै 2023 रोजी यूपीएससी प्रशिक्षणासाठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेमध्ये काही परीक्षार्थी उमेदवारांनी गैरप्रकार केल्याच्या तक्रारी महाज्योती कार्यालयास प्राप्त झाल्या होत्या. याबाबत व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त केले होते. चौकशी अधिकारी यांनी परीक्षा घेणाऱ्या एजन्सीकडून गैरप्रकार केलेल्या विद्यार्थ्यांचा अहवाल मागविला होता.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र  उपलब्ध झाल्यानंतर दिनांक 30 जुलै 2023 रोजी एमपीएससी प्रशिक्षणासाठी प्रवेश परीक्षा घेण्यात आली. या परीक्षे दरम्यान विशिष्ट प्रशिक्षण संस्थेतील सराव प्रश्नपत्रिका मधील प्रश्न जसेच्या तसे घेण्यात आल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी महाज्योती कार्यालयाकडे केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत चौकशी करण्याच्या सूचना व्यवस्थापकीय संचालक यांनी मुख्य लेखा वित्त अधिकारी यांना दिल्या होत्या. याबाबत चौकशी अधिकारी यांनी परीक्षा घेणाऱ्या एजन्सीला याबाबत खुलासा करण्याकरिता सांगितले होते. परीक्षा एजन्सीकडून महाज्योतीच्या चौकशी अधिकारी यांना खुलासा सादर करण्यात आला. मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी या प्रकरणांची सखोल चौकशी करून त्या संदर्भातील अहवाल व्यवस्थापकीय संचालक यांना सादर केला.

या चौकशी अहवालामध्ये परीक्षा घेणाऱ्या एजन्सीने निष्काळजीपणा केल्याचे सिद्ध झाले आहे. परीक्षा घेणाऱ्या एजन्सीने केलेल्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. तसेच त्यांचे आर्थिक नुकसान आणि वेळेचा अपव्यय झाल्याची बाब तसेच परीक्षा एजन्सीने केलेल्या निष्काळजीपणामुळे महाज्योतीची प्रतिमा मलीन झाली आहे. त्यामुळे सामंजस्य करारातील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक यांनी परीक्षा एजन्सीचा कार्यादेश रद्द करण्याचे आदेश आज दिनांक 3 ऑगस्ट रोजी निर्गमित केले आहे.

पुन्हा होणार प्रवेश परीक्षा

यूपीएससी व एमपीएससी प्रशिक्षणासाठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असून परीक्षा घेण्यासाठी अन्य यंत्रणेची निवड करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. परीक्षेच्या वेळापत्रकाबाबतची माहिती विद्यार्थ्यांना महाज्योतीच्या संकेतस्थळावरून प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळविण्यात येणार आहे.

Previous Post

मध केंद्र योजनेसाठी इच्छूकांकडून अर्ज मागविले

Next Post

टोमॅटोला बाजारभाव मात्र पीकच उपलब्ध नाही

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
टोमॅटोला बाजारभाव मात्र पीकच उपलब्ध नाही

टोमॅटोला बाजारभाव मात्र पीकच उपलब्ध नाही

रोजगार मेळावा

रोजगार मार्गदर्शन केंद्रातर्फे गुरूवारी पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.