• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 28, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अन्न व पोषण सुरक्षा अभियानातील विविध लाभांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Our Media by Our Media
August 2, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ, शेती
Reading Time: 1 min read
91 1
0
पीक कर्जाचे नुतनीकरण दि.30 जूनपूर्वी करा -जिल्हाधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आवाहन
13
SHARES
654
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि. 2: राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियान, तसेच कडधान्य व खाद्यतेल अभियान (गळितधान्य) योजनेतील विविध लाभांसाठी शेतकरी उत्पादक कंपनी, गट व वैयक्तिक शेतकरी यांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.

या अभियानात बीज प्रकिया संच, गोदाम सुविधा, बीजप्रक्रिया यंत्र, घरगुती साठवणूक कोठी, टोकन यंत्र, छोटे तेलघाणी यंत्र आदी विविध साधनांसाठी अनुदान दिले जाते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

बीज प्रक्रिया संच

राष्ट्रीय अन्न आणि पोषण सुरक्षा अभियान कडधान्य योजनेत शेतकरी उत्पादक संघ, कंपनी यांना बीजप्रक्रिया प्रकल्पाचा लाभ घेता येतो. उत्पादित बियाण्यावर प्रक्रिया करून दर्जेदार बियाणे उपलब्ध होण्याच्या दृष्टीने प्रमाणित बियाणे उत्पादन करणारे शेतकरी उत्पादक संघ, कंपनी यांना बीज प्रकिया प्रकल्प उभारणी करण्यासाठी यंत्रसामुग्री, तसेच बांधकामासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा कमाल 10 लक्ष रू. पर्यंत अनुदान मिळते. त्यासाठी शेतकरी उत्पादक संघ किंवा कंपनीला बँकेकडे कर्जासाठी प्रकल्प प्रस्ताव द्यावा लागतो. बँकेने कर्ज मंजूर केल्यावर ते अनुदानाचा लाभ मिळण्यासाठी पात्र होतात.

गोदाम सुविधा

अन्नधान्य उत्पादनाच्या सुधारित साठवणुकीसाठी व मूल्यवृद्धीसाठी गोदाम सुविधा आवश्यक आहे. योजनेत 250 मे. टन क्षमतेचे गोदाम बांधकाम करण्यासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा 12 लक्ष 50 हजार यापैकी जे कमी असेल त्याप्रमाणे अनुदान मिळते. इच्छूक अर्जदार शेतकरी उत्पादक संघ किंवा कंपनी यांनी केंद्र शासनाच्या ग्रामीण भंडारण योजना किंवा नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बँकेकडे प्रकल्प सादर करावा. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर अर्जदार पात्र ठरेल.

बीज प्रक्रिया संच व गोदाम सुविधेसाठी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत अर्ज तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावा. जिल्ह्यासाठी प्राप्त लक्ष्यांकापेक्षा अधिक शेतकरी गट, शेतकरी उत्पादक संघ किंवा कंपनीचे अर्ज प्राप्त झाल्यास जिल्हास्तरीय अन्न सुरक्षा अभियान कार्यकारी समितीच्या मान्यतेने सोडत पद्धतीने लाभार्थ्यांची  निवड होते.

मनुष्यचलित बीजप्रक्रिया यंत्र

शेतकरी वैयक्तिक वापरासाठी बीज प्रक्रिया यंत्र खरेदी करू शकत नाहीत. त्यामुळे गटामार्फत बीजप्रक्रिया यंत्र अनुदानावर देण्यात येते. या मनुष्यचलित यंत्राच्या खरेदीसाठी किमतीच्या 50 टक्के किंवा कमाल 8 हजार रू. अनुदान मिळते. यासाठी महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी गटांनी अर्ज करणे आवश्यक आहे.

घरगुती साठवणूक कोठी

कडधान्य व पौष्टिक तृणधान्य पीकांसाठी साठवणूक सुविधेची गरज असते. त्यामुळे घरगुती साठवणूक कोठी अनुदानावर मिळते. एका लाभार्थ्याला पाच क्विंटल मर्यादेपर्यंत साठवणूक कोठी दिली जाते. त्यासाठी किमतीच्या 50 टक्के किंवा 2 हजार रू. मर्यादेत अनुदान मिळते.

मनुष्यचलित टोकन यंत्र

गळितधान्य पीकाच्या पेरणीत सुलभता आणण्यासाठी व बियाण्याची बचत करण्याच्या हेतूने मनुष्यचलित टोकन यंत्र व मनुष्यचलित सायकलवर चालणारे सीड ड्रील याचाही अभियानात समावेश आहे. यासाठी अनुदान गटामार्फत किंवा वैयक्तिकही मिळते. मनुष्यचलित टोकन यंत्र खरेदीसाठी 10 हजार रू. प्रतियंत्र व मनुष्यचलित सायकलवर चालणारे सीड ड्रील खरेदीसाठी 5 हजार रू. प्रतियंत्र किंवा किमतीच्या 50 टक्के यात जे कमी असेल त्यानुसार अनुदान मिळते. यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा लागतो.

छोटे तेलघाणी सयंत्र

राष्ट्रीय खाद्य तेल अभियानात (गळितधान्य) उत्पादित मालाच्या मूल्यवृद्धीसाठी छोटे तेलघाणी सयंत्रासाठी अनुदान मिळते. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्प, अत्यल्प भूधारक व महिला शेतक-यांसाठी किमतीच्या 60 टक्के किंवा कमाल 1 लाख 80 हजार रू. आणि इतर शेतक-यांना किमतीच्या 50 टक्के किंवा 1 लाख 50 हजार रू. अनुदान मिळते. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार लुधियाना येथील सीआयपीएचईटी व तत्सम केंद्रीय संस्थेने तपासणी केलेल्या मिनी ऑईल मिल, तेलघाणी मॉडेलला अनुदान अनुज्ञेय आहे. त्यासाठी महाडीबीटीवर अर्ज करणे आवश्यक आहे.

Previous Post

यशप्राप्तीसाठी नियोजन, वेळेचे व्यवस्थापन व मेहनत आवश्यक – जिल्हाधिकारी अजित कुंभार

Next Post

तीन हजारांची लाच स्वीकारताना नायब तहसिलदारास अटक

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
bribe

तीन हजारांची लाच स्वीकारताना नायब तहसिलदारास अटक

women indian army

सैनिक शाळांतील मुलींची वाढती संख्या

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.