• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 5, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पावसाची रिपरिप… कीर्र अंधारात मदतीसाठी सरसावले शेकडो हात

Our Media by Our Media
August 1, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
100 2
0
पावसाची रिपरिप… कीर्र अंधारात मदतीसाठी सरसावले शेकडो हात
15
SHARES
725
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई–नागपूर समृद्धी महामार्गावर शहापूर तालुक्यातील सरळाबे कासगाव गावाजवळ पुलाचे काम सुरू असताना सोमवारी (दि.३१) रात्री साडे अकराच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. सुमारे दीडशे फूट उंचावरून सिमेंटचे गर्डर, लोखंडी सेफ्टी लॉचर आणि क्रेन कोसळली. यात १८ मजुरांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत. पावसाची रिपरिप… कीर्र अंधार… विखुरलेले मृतदेह… जखमींचा मदतीसाठी सुरू असलेला धावा, अशी दुर्घटनास्थळी अंगावर शहारे आणणारी विदारक परिस्थिती दिसत होती.

या दुर्घटनेची  बातमी वाऱ्यासारखी पसरली. सोमवारी रात्री १ च्या सुमारास घटनास्थळी रात्रीच्या अंधारात सिमेंट, लोखंडी गर्डरच्या महाकाय सांगड्याखाली मृतदेह अस्ताव्यस्त विखुरलेले दिसत होते. तर ढिगाऱ्याखाली अडकलेले काही जण जीवाच्या आकांताने वाचवा, वाचवा अशी आरोळी देत होते. घटनास्थळी दाखल झालेले ग्रामस्थ, पोलीस, महसूल कर्मचारी, शहापुरातील काही मंडळी व आपत्ती व्यवस्थापन टीम, कसारा व्हॉट्सअॅप ग्रुपची मंडळी मदत कार्यासाठी पुढे सरसावली.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

तहसीलदार कोमल ठाकूर, उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे, पोलीस, महसूल कर्मचारी यांच्यासह आपत्ती व्यवस्थापनचे शाम धुमाळ, मनोज मोरे, विनंद आयरे, प्रसाद दोरे, सुनील करावर, रुपेश भवारी, गणेश शिंदे, फाययाज शेख, प्रकाश गायकर, यांच्यासह उपजिल्हाधिकारी रेवती गायकर, प्रांताधिकारी सानप यांच्यासह, शेकडो हातांनी पाऊस, चिखल, गाळ, अंधार याची पर्वा न करता मदतकार्य सुरु केले.

मोबाईल बॅटरीसह सोबत आणलेल्या बॅटरीच्या प्रकाशात ३ जखमी मजूर आणि ५ मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. मदतीसाठी आलेल्या सर्वांनी आपली सुरक्षितता बाळगून मदत कार्य सुरु ठेवले. पहाटे ४ पर्यत १२ मृतदेह शहापूर ग्रामीण रुग्णाल्यात पाठवण्यात आले. परंतु, त्यानंतर मदतकार्यात अनेक अडचणी येऊ लागल्या. ढिगारा, लोखंडी गर्डर उचलण्यासाठी क्रेन, जेसीबीची गरज भासू लागली.

पहाटे क्रेन, गॅस कटर च्या साह्याने लोखंडी पाईप कापण्यास सुरुवात केली. तर मोठे जनरेटर लावून लाईटची व्यवस्था करण्यात आली. कमी क्षमतेच्या क्रेनने लोखंडी गर्डर उचलण्यास मर्यादा येऊ लागल्या. त्यामुळे काही वेळाने मोठी क्रेन मागविण्यात आली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता ठाण्याहून एनडीआरएफचे पथक सकाळी दाखल झाले. त्यांनी उर्वरित मृतदेह क्रेनच्या मदतीने बाहेर काढले. त्यातच या अपघातात जखमी झालेल्या प्रेम प्रकाश या तरुणाला मानसिक धक्का बसला आहे. घटनास्थळावरील विखुरलेले मृतदेह आणि विदारक परिस्थिती मनाला चटका लावून जात होती.

Previous Post

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Next Post

उपकार्यकारी अभियंता संतोष खुमकर यांचा सत्कार तांत्रिक कामगार युनियन व विविध संघटनाचा पुढाकार

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
उपकार्यकारी अभियंता संतोष खुमकर यांचा सत्कार तांत्रिक कामगार युनियन व विविध संघटनाचा पुढाकार

उपकार्यकारी अभियंता संतोष खुमकर यांचा सत्कार तांत्रिक कामगार युनियन व विविध संघटनाचा पुढाकार

पंतप्रधान नरेंद्र मोदी दगडूशेठ गणपतीच्या चरणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी दगडूशेठ गणपतीच्या चरणी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.