अकोला,दि. ३१ : जिल्ह्यातील विद्यार्थ्याच्या अभिनव संकल्पना व संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत ‘महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज’ स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत अधिकाधिक विद्यार्थ्यांनासहभागी करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी महाविद्यालयांना केले आहे.
स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी महाविद्यालयांच्या प्राचार्यांची ऑनलाईन बैठक दि. २ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वा. होणार असून, सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी केले आहे.
ऑनलाईन बैठकीची लिंक : https://meet.google.com/yzv-bnak-hcn अशी आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला या कार्यालयास प्रत्यक्ष अथवा 0724-2433849 या दुरध्वनी क्रमांकावर किंवा 9665775778 या क्रमांकावर संपर्क साधावा. महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या नवसंकल्पनांचा शोध घेणे त्यांचे नवउद्योजकतेचे स्वप्न साकार करण्यासाठी योग्य ते पाठबळ पुरवणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. सर्व महाविद्यालये, शासकीय, खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था यात शिक्षण, प्रशिक्षण घेत असलेले विद्यार्थी स्पर्धेसाठी पात्र आहेत.