पातूर : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी त्यांच्या नियोजित दौऱ्यातील वाशीमची सकाळची बैठक संपवून त्यांच्या पातूर विभागातील धारकऱ्यांना सदिच्छा भेट देण्यासाठी पातूरला आले असता पातूर शहरातील तमाम हिंदू बांधवांनी त्यांचे जंगी स्वागत केले . छत्रपती श्री संभाजी महाराज चौक येथे धारक – यांनी उभारलेल्या भगव्या ध्वजाचे पूजन करून त्यांच्या शुभहस्ते ध्येय मंत्राचे पठन करून भगवा ध्वज डौलाने फडकविण्यात आला . त्याच चौकात असलेल्या राष्ट्रपुरुष सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकावर गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी यांनी त्यांच्या पुतळ्याचे पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण केले यावेळी उपस्थित असलेल्या धारक – यांनी त्यांच्या समर्थनात मां जिजाऊ माता, महाराणा प्रताप, छत्रपती श्री शिवाजी महाराज , धर्मवीर श्री संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, यांच्या जोरदार घोषणा देत भारत माता की जय म्हणत आकाश दुमदुमूवून टाकला. त्यानंतर पातूरचे ग्रामदेवता संत श्री सिदाजी महाराज यांच्या मंदिरात छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संत श्री सिदाजी महाराजांचे गुरूजींनी मनोभावे पूजन करून शाल श्रीफळ व पुष्पहार घालून दर्शन घेतले मंदिराच्या आवारात गुरुजींचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले तसेच मंदिराच्या आवारात गुरूजींना भेटण्यासाठी तालुक्यातील शेंकडों धारकरी यावेळी हजर होते.
शहरातील रस्ते रांगोळी व फुलांनी सजले होते ठिक ठिकाणी महिलांनी गुरूजींचे पाय धुऊन औक्षण केले. या सदिच्छा भेटीचे आयोजन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पातूर विभाग चे प्रमुख धारकरी विजय राऊत, धारकरी शिवकुमारसिंह बायस धारकरी सुहास देवकर, श्री सिदाजी महाराज व्यायाम शाळेचे अध्यक्ष धारकरी पै.मंगेश गाडगे, धारकरी प्रमोद श्रीनाथ धारकरी सुरेश गव्हाळे सह त्यांच्या मित्रपरिवाराने केले होते याप्रसंगी माजी पातूर पंचायत समिती सभापती अनंता बगाडे , पातूर पातूर तालुका विकास मंचाचे अध्यक्ष ठा . शिवकुमारसिंह बायस शिवसेना शिंदे गट शहराध्यक्ष पवन तायडे, सुनिल गाडगे, छगन कराळे, संजय गोतरकार , प्रविण इंगळे , सचिन बायस , विष्णू शेलारकर , विठ्ठल डिके , राहूल भगत , दिलीपसिंह बायस , महेश बोचरे ,गोपाल निलकंठ , आशा निलकंठ , राजेश राऊत , गोपाल निलकंठ , आशा निलकंठ , राजेश राऊत , गोपाल निलकंठ , आशा निलकंठ , राजेश राऊत , संकेत गि – हे सागर गि-हे , सिमा गि-हे , रत्ना राऊत , वर्षा देवकर , उषा राऊत , अलका राऊत चंचल गि-हे , वैष्णवी राऊत , साक्षी राऊत , जय देवकर , अंजली राऊत , चैतन्य राऊत ओम देवकर , विक्की तायडे , कार्तिक डिके , महात्मा फुलेचा वेश धारण केलेला चि. राघव गाडगे शहरातील शेकडो ग्रामस्त मंडळी उपस्थित होते. सदिच्छा भेटी प्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी गोकुलराज आणि पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेळके यांनी चोख बंदोबस्त ठेवला.