• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 10, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मुख्यमंत्री शिंदेंनी सहकुटुंब घेतली पंतप्रधान मोदींची भेट

Our Media by Our Media
July 22, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
118 1
0
मुख्यमंत्री शिंदेंनी सहकुटुंब घेतली पंतप्रधान मोदींची भेट
17
SHARES
853
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि.२२जुलै) सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली, याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडेलवरून  दिली आहे. त्‍यांनी या भेटीचे फाेटाेसह  पंतप्रधानांशी झालेल्या संवादाचा तपशीलदेखील शेअर केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की,  कुटुंबातील व्यक्तींना पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत, सदिच्छा भेटीला बोलावून प्रेमाने विचारपूस केली. याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदेंसह त्यांचा मुलगा खासदार श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्र्यांचे वडील, पत्नी, सून आणि नातू पीएम मोदी यांच्या भेटीसाठी उपस्थित होते.

यावेळी पीएम मोदी यांनी महाराष्ट्रात राबविल्या जाणाऱ्या विकासकामांबाबत चर्चा केली. तसेच महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्राकडून पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन देखील दिले. दरम्यान पीएम मोदी यांनी महाराष्ट्रातील अतिवृष्टीच्या परिस्थितीबाबत माहिती घेतली. तसेच रायगडमधील इर्शाळवाडीतील दुर्घटनेसंदर्भात सहवेदना व्यक्त करत बचावकार्य आणि पुनर्वसनाबाबत  माहिती घेतली, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले आहे.

मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्प हा मुंबईचा चेहरा बदलणारा प्रकल्प असल्याने, तो विनाअडथळा वेगाने पूर्ण करा. रखडलेले पुर्नविकास प्रकल्प त्वरित मार्गी लावा, असा सल्ला पीएम मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या भेटीदरम्यान दिला. कोकणातील पाणी दुष्काळग्रस्त भागात कसे वळवता येईल, मराठवाडा वॉटर ग्रीड या राज्य सरकारच्या योजना याचीदेखील पीएम मोदी यांनी माहिती घेतली. याशिवाय राज्यातील आरोग्य व्यवस्था, उपलब्ध शैक्षणिक सुविधा, आवश्यक बदल या मुद्द्यांवरही चर्चा केली, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

आई होती…माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री भावुक

ज आमच्या चार पिढ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटल्या याचा मला निश्चितच आनंद आहे. आज माझी आई हवी होती असे मला आवर्जून वाटते आहे.माझे वडील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून आनंदी झाले आहेत,असेही मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना सांगितले. माझ्या वडिलांना आनंद झाला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायचे ही त्यांचीही इच्छा होती.आज आमच्या चार पिढ्या एकत्र होत्या.पंतप्रधानांनी माझ्या नातवाबरोबरही गप्पा मारल्या आणि खेळले त्याचाही मला विशेष आनंद आहे,असेही मुख्यमंत्री म्हणाले.

एका ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाची संस्मरणीय भेट- डॉ.श्रीकांत शिंदे

आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी सहकुटुंब भेट घेतली. आज आमच्या शिंदे परिवाराच्या चार पिढ्यांनी एकाचवेळी पीएम मोदी यांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्यासोबत घालवलेले काही क्षण त्याच्या संवेदनशील ममत्वपणाची अनुभूती देऊन गेले. पीएम मोदी यांनी या भेटीदरम्यान मारलेल्या गप्पांनी आम्ही शिंदे परिवार भारावून गेले. पीएम मोदी यांनी आमच्या कुटुंबाचाच एक भाग होऊन संवाद साधतानाचा प्रसंग सर्वांसाठी आयुष्यभर जपावा असा सुवर्णक्षण ठरला. ही भेट म्हणजे देशाच्या राजकारणातील एका ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाची संस्मरणीय भेट ठरल्याचे देखील डॉ.श्रीकांत शिंदे यांनी ट्विटरवर म्हटले आहे.

Previous Post

यवतमाळमध्ये पुरात ४५ जण अडकले, सुटकेसाठी दोन हेलीकॉप्टर तैनात

Next Post

युपीएससी पूर्व परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ‘महाज्योती’ चे अर्थसाह्य

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
युपीएससी पूर्व प्रशिक्षणासाठी महाज्योती घेणार पुन्हा प्रवेश परीक्षा

युपीएससी पूर्व परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ‘महाज्योती’ चे अर्थसाह्य

पाऊस

महाराष्ट्रातील 'या' सहा जिल्ह्यांना २७ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.