अकोला,दि.17 : हवामान विभाग, नागपूर यांच्या संदेशानुसार शुक्रवार (दि.21जुलै) पर्यंतच्या कालावधीत जिल्ह्यामध्ये पाऊस येण्याची शक्यता वर्तविलेली आहे.
नदीकाठावरील गावातील नागरिकांनी नदी, नाले, ओढे इत्यादी ठिकाणी पाऊस सुरु असतांना किंवा पूर परिस्थिती असतांना पूर पाहण्यास गर्दी करु नये. पुलावरुन पाणी वाहत असतांना दुचाकीने किंवा प्रत्यक्ष जाण्याचे टाळावे. नागरिकांना आवश्यक ती दक्षता घेण्याच्या अनुषंगाने सतर्कतेचा इशारा देण्यात यावा. विजेपासून बचावाच्या अनुषंगाने आवश्यक दक्षता घ्यावी. झाडाखाली उभे राहू नये. अनुचित घटना टाळण्यासाठी पुर्णा, मोर्णा व इतरही लहान मोठ्या नदी नाल्यामध्ये पोहण्याचे धाडस करु नये. तसेच सर्व यंत्रणांनी योग्य ती दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.