अकोला,दि.12 : पिकांची उत्पादकता वाढ व शेतकऱ्यांना प्रोत्साहन करण्यासाठी कृषि विभागामार्फत खरीप पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य तूर, मुंग, उडीद, मक्का. ज्वारी, बाजरी, नाचणी, सोयाबीन, सुर्यफुल व भूईमूंग या प्रमुख पिकांची निवड करण्यात आली असून स्पर्धेकरीता अर्ज मागविले आहे. उडीद व मूंग या समाविष्ट पिकांसाठी सोमवार दि. 31 जुलैपर्यंत तर इतर पिकांसाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी आपले अर्ज नजीकच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे तसेच आपल्या गावातील कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक व मंडळ कृषि अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी केले.