• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 29, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू! पत्नीचा पतीला वाचवण्यासाठीचा प्रयत्न अपयशी

Our Media by Our Media
July 11, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
144 2
0
tiger
21
SHARES
1k
VIEWS
FBWhatsappTelegram

चंद्रपूर : बांधावर तुरी लावण्याकरीता पत्नी सोबत गेलेल्या एका 45 वर्षीय शेतकऱ्याला स्वत:च्याच शेतातून आज (दि. ११) मंगळवारी दुपारच्या सुमारास वाघाने उचलून नेल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना चिमूर तालुक्यातील सावरगाव शेतशिवारात आज (दि. ११) मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. पत्नीने पतीला वाचविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, परंतु जंगलाच्या दिशेने वाघाने तोंडात घेऊन गेल्याने जीव वाचू शकला नाही. तब्बल तीन तासांनी शेतकऱ्याचा मृतदेह वनविभागाच्या हाती लागला आहे. ईश्वर गोविंदा कुंभारे असे मृतकाचे नाव असून तो चिमूर तालुक्यातील सावरगाव येथील रहिवासी होता.

घटनेची इकीकत अशी की, सावरगाव पासून २ किमी अंतरावर शेतकरी ईश्वर कुंभारे यांचे स्वत:चे शेत आहे. शेताला लागूनच घनदाट जंगल आहे. या जंगलात वाघाचा वावर आहे. त्यामुळे या परिसरात भितीचे वातावरण बऱ्याच दिवसापासून आहे. मंगळवारी (दि. ११) सकाळी हा शेतकरी शेतातील कामाकरिता पत्नीला सोबत घेऊन गेला होता. पती व पत्नी दोघेही शेतात काही अंतरावर तुरी लावत असताना दुपारी अडीच वाजताच्या सुमारास अचानक वाघाने जंगलातून येऊन पती ईश्वर कुंभारे यांच्यावर हल्ला केला. या शेतकऱ्याला  तोंडात पकडून वाघ जंगलाच्या दिशने गेला. हा संपूर्ण प्रकार पत्नीच्या डोळ्या देखत घडल्याने ती घाबरली. पतीला वाचविण्याकरीता वाघ ज्या देशेने गेला त्या दिशेला त्या धावल्या. पत्नीने लगतच्या शेतकऱ्याकडे मतदतीसाठी धाव घेतली. प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत पत्नीने घडलेला सर्व प्रकार अन्य शेतकऱ्यांना सांगितला.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

काही शेतकरी मदतीला धावून आले. त्यांनी घटनास्थळापासून जंगलाच्या दिशेने जावून शेतकऱ्याचा शोध घेतला, परंतु वाघाने त्याला जंगलात घेऊन गेल्याने त्याचा पत्ता लागला नाही. दरम्यान नेरी बिटाचे क्षेत्रसहाय्यक रासेकर यांना या घटनेची माहिती देण्यात आली. वनपरिक्षेत्राधिकारी देऊळकर यांच्या समवेत रासेकर आपल्या सहकाऱ्यासमवेत घटनास्थळी दाखल झाले. तब्बल तीन तासाच्या शोधमोहिमेनंतर जंगलात शेतकरी ईश्वर कुंभारे यांचा मृतदेह आढळून आला.

त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. ते घरचा कर्ता पुरुष होते. त्यांच्या मृत्यूने कुटूंबिय उघड्यावर आले आहे. कुंभारे परिवात शोककळा तर सावरगाव परिसरात प्रचंड भिती पसरली आहे. याच परिसरात काही महिन्यांपूर्वी शेतात काम करणाऱ्या महिलेला वाघाने पंजा मारला होता. मोठ्या शिताफिने त्या महिलेने स्वत:ची सुटका करून घेतली होती. तेव्हापासूनच या परिसरात शेतकरी शेतमजूरांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण पसरले आहे. शेतकरी वारंवार वाघाच्या बंदोबस्ताची मागणी करीत आहेत. परंतु वनविभाग बंदोबस्त करण्यास अपयशी ठरले आहे. त्यामुळे शेतकरी शेतमजूर व नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. मृतकाच्या कुटूंबियांना तत्काळ आर्थिक मदतीची मागणी नागरिकांनी केली आहे.

Previous Post

आयटीपेक्षा आयटीआयचे विद्यार्थी भारी ! विद्यार्थ्यांना 29 लाखांचे पॅकेज

Next Post

खरीप हंगाम पिकस्पर्धेसाठी अर्ज मागविले शेतकरी बांधवानी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
खरीप पिकांच्या एमएसपी दरात भरीव वाढ

खरीप हंगाम पिकस्पर्धेसाठी अर्ज मागविले शेतकरी बांधवानी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

अलर्ट मोडवर

उत्तर भारतात मुसळधार पण पावसाने 'या' राज्यांकडे फिरवली पाठ!

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.