कपिलदेव निखंज, सचिन तेंडुलकर, झहीर खान यांच्या पावलांवर पाऊल ठेवून विख्यात भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना याने हॉलंडची राजधानी असलेल्या अॅमस्टरडॅम शहरात रैना एसआर हे नवे रेस्टॉरंट उघडले आहे.
खवय्यांना चमचमीत पदार्थांची मेजवानी देण्याच्या हेतूने त्याने पाककला विश्वात प्रवेश केला आहे. तो स्वतः पट्टीचा खवय्या असून त्याला जगभरातील उत्तमोत्तम पदार्थांचा आस्वाद घेण्याची आवड आहे. यातूनच त्याला रेस्टॉरंटची कल्पना सुचली. क्रिकेटच्या निमित्ताने त्याला जगभर भरपूर प्रवास करायला मिळाला. याद्वारे त्याला नवनव्या पदार्थांची ओळख झाली. या अनुभवातून त्याने स्वतःचेच परिपूर्ण रेस्टॉरंट उघडण्याचे ठरवले.
‘रैना इंडियन रेस्टॉरंट’ एक असाधारण जेवणाचा अनुभव देते. जिथे लोक अनुभवी शेफने काळजीपूर्वक तयार केलेल्या अस्सल भारतीय जेवणाचा आस्वाद घेऊ शकतात. मेनू उत्तर ते दक्षिण, पूर्व ते पश्चिम भारताच्या समृद्ध पाककलेच्या वारशातून प्रेरित खाद्यपदार्थांची स्वादिष्ट निवड प्रदर्शित करतो. प्रत्येक थाळी रैना इंडियन रेस्टॉरंटने वितरीत करण्याचे वचन दिलेली सत्यता आणि चव याची साक्ष आहे. सध्या रैना क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. मात्र, यादरम्यान तो कॉमेंट्री करताना दिसत आहे.