• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 24, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

गायींची कत्तल करुन गोमास विक्री केल्या प्रकरणात अकोट येथिल आरोपीचा अटकपूर्व जामीन नामंजुर

Editor by Editor
June 17, 2023
in अकोला जिल्हा, गुन्हा
Reading Time: 1 min read
84 1
0
गायींची कत्तल करुन गोमास विक्री केल्या प्रकरणात अकोट येथिल आरोपीचा अटकपूर्व जामीन नामंजुर
12
SHARES
604
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोट(प्रतिनिधी)– अकोट येथिल अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश चकोर बाविस्कर यांनी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे फाईलवरील अपराध क्र. २३/२३ भा.द.वि. कलम ३७९ (३४) सहकलम ५.५ क प्राणी संरक्षण अधिनियम या गुन्ह्यातील आरोपी जमीरोदिन उर्फ जम्मु अलीमोदन वय २६ वर्ष रा. ताहपुरा अकोट याचा गायींची कत्तल करुन गायीचे मास विक्री केल्याबद्दलचे या प्रकरणात दाखल अटकपूर्व जमानत अर्ज नामंजुर केला आहे.

या प्रकरणाची हकीकत अशी आहे की या प्रकरणातील फिर्यादी सुनिल महादेवराव सावरकर रा. चंडिकापुर ता. अकोट जि. अकोला यांनी ग्रामीण पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की दि. १२/०१/२०२३ रोजी त्यांच्या मालकी हक्काचे गोवंश जातीचे जनावरे गायी, बैल व वासरे यांना चारा पाणी करुन घरासमोर रात्रीचे दरम्यान बांधले व दुसऱ्या दिवशी दि. १३/०१/२०२३ रोजीचे सकाळी ५ वाजता उठुन पाहले असता त्यामधील बैल, ३ गाई व दोन वासरांपैकी २ गाई दिसल्या नाहीत त्यांचे दोर कापलेले दिसले आजुबाजुला शोध घेतला असता मिळुन आल्या नाही १ लाल रंगाची गाय व १ पांढऱ्या रंगाची गाय या दोन गाईंची एकुण किंमत रु. १६,०००/- सोळा हजार रु. कोणीतरी अ गात इसमाचे चोरुन नेले आहे याच फिर्यादीवरुन वरील प्रमाणे गुन्हा अकोट ग्रामीणचे ठाणेदार श्री. नितीन देशमुख यांनी दाखल करुन तपासामध्ये घेतला.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

या प्रकरणात उपरोक्त फरार आरोपी जमीरोदिन याचे अटकपूर्व जमानत अर्जाच्या युक्तीवादामध्ये सरकारी वकील अजित देशमुख यांनी सरकारतर्फे न्यायालयात युक्तीवाद केला की या गुन्ह्याचे तपासात निश्पन्न आरोपी कुदरत खाँ उर्फ जावेद अहेसान खाँ वय २२ वर्ष रा. मजेठीया प्लॉट अकोट यांने वरील गुन्ह्याची कबुली दोन पंचासमक्ष दिल्याने या आरोपीकडुन पंचासमक्ष मेमोरेंडम पंचनामा प्रमाणे या गुन्ह्यात चोरुन नेलेल्या गाईची कत्तल करुन मास विक्री केल्याचे ठिकाण दाखवले व गुन्ह्यात गाईची कत्तल करून विक्री केलेले ४००० रु पंचासमक्ष काढुन दिले व पुराव्याकरीता ताब्यात घेतले आहेत. तसेच यातील दुसरा आरोपी नामे रमीज राजा उर्फ सोनु अब्दुल नसीर पटेल वय २२ वर्ष रा. ग्राम वडाळी सटवाई ता. अकोट जि. अकोला या आरोपीने देखिल वरील गुन्ह्याची कबुली दोन पंचासमक्ष दिल्याने गुन्ह्यात चोरुन नेलेल्या गाईची कत्तल करुन विक्री केलेले ५००० रु दोन पंचासमक्ष या आरोपीने काढुन दिले व ते देखिल पोलीसांनी पुराव्याकामी जप्त करून पंचानामा करुन ताब्यात घेलते आहे.

तसेच या दोन्ही आरोपींनी या गुन्ह्यातील साथीदार आरोपी नामे फिरोज खान रफिक खान वय ४१ वर्ष रा. उस्मान पुरा, बुधवारा अंजनगांव सुर्जी याला देखिल पोलीसांनी अंजनगांव सुर्जी येथून अटक केले व त्याच्याकडे असलेली टाटा इंडिगो क्र. एम.एच ४९ एफ ०३७३ चे कागदपत्रांबाबत व त्याने गुन्हा करतेवेळी सोबत असलेले त्याचे साथीदार मुजाहीद रा. अकोट व जम्मू उर्फ जमिरोदिन रा. अकोट असे पोलीसांना सांगितले. अकोट पोलीसांनी फरार आरोपी जमिरोहिन उर्फ जम्मु अलीमोदिन रा. ताहपुरा अकोट येथे जावुन पोलीसांनी विचार पुस केली असता हा आरोपी मिळुन आला नाही व तो फरार आहे.

तसेच या प्रकरणात सरकारतर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी अतिरिक्त मुद्दे युक्तीवादामध्ये वि. कोर्टासमोर सांगितले की आरोपी जमिरोद्दिन उर्फ जम्मु अलीमोद्दिन रा. ताहपुरा अकोट याने वरील गुन्हा गंभीर स्वरुपाचा केला असुन अकोट शहर हे अति संवेदनशिल असल्याने व यातील आरोपींनी हिंदु समाजाच्या गाई व बैलांची कत्तलीसाठी चोरी केली असल्याने या गुन्ह्यातील अटक आरोपी साथीदार यांनी गुन्ह्याची कबुली दिली असुन त्यांनी चोरलेल्या गुन्ह्यातील गाईंची कत्तल करुन त्या विक्री केल्या असल्याचे सांगितल्याने आरोपींच्या हिश्यावर आलेले रुपये हे गुन्ह्यात पुराव्याकामी जप्त केलेले आहेत. तसेच या गुन्ह्यातील अर्जदार आरोपी याने या अगोदर पोलीस स्टेशनच्या हद्दीतुन व इतर ठिकाणी किती गोवंश जातीचे जनावरांची चोरी केली आहे व कत्तल केली आहे व कोणास विक्री केले आहे व त्याची कशी विल्हेवाट लावली आहे याबाबत सखोल विचारपुस करण्याकरीता या अरोपीची पोलीस कस्टडी मध्ये विचारपुस होणे आवश्यक आहे. तसेच या गुन्ह्यातील हा अर्जदार आरोपी गुन्हेगार प्रवृत्तीचा असुन याचे विरुध्द पोलीस स्टेशन अकोट शहर येथे गोवंशी जातीचे जनावरे, चोरीचे गुन्हे व इतरही गुन्हे दाखल असुन यावर न्यायालयामध्ये कोर्ट केसेस प्रलंबित आहेत. त्याच प्रमाणे या गुन्ह्यातील अर्जदार आरोपी याची आनखीन १ साथिदार से, मजुहीद से मोहसिन वय २२ वर्ष रा. कागंर पुरा अकोट हा कोठे लपुन बसला आहे या बाबत देखिल विचारपुस करुन या साथिदाराला देखिल अटक करणे बाकी आहे. तसेच या गुन्ह्यातील हा अर्जदार आरोपी याने या गुन्ह्यात चोरुन नेलेल्या गाईची कत्तल करून विल्हेवाट कोठे व कशी लावली याबाबत देखिल या अरोपीला विचारणा करणे आवश्यक आहे. तसेच वरील गुन्ह्या व्यतिरिक्त या पुर्वी अटक असलेले अपराध नं. ३३१/ २०२२ मधील या अर्जदार आरोपीचे साथिदार यांनी गौवंश जातीचे जनावर चोरी केले असलेबाबत विचारपुस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली केली आहे. वरील सर्व परिस्थिती व मुद्दे लक्षात घेता सरकारी वकील अजित देशमुख यांनी सरकारतर्फे वि न्यायालयाला विनंती केली की वरील गुन्ह्यातील फरार अरोपी जमिरोहिन उर्फ जम्मु अलीमोदिन रा. ताहपुरा अकोट याला अटकपूर्व जामीन दिल्यास तो या प्रकरणातील साक्षीदार यांचेवर दबाव टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वि. कोर्टाने वरील प्रकरणातील अटकपूर्व जमानत अर्ज कृपया नामंजुर करावा. दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर वि. कोर्टाने आरोपीचा अटकपूर्व जमानत अर्ज नामंजुर केला आहे…

Previous Post

विद्यार्थ्यांनो, समजून घ्या : कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची आवड आणि प्रवेशाचे वास्तव

Next Post

प्रधानमंत्री किसान सन्मान योजना – ई-केवायसी व आधार सिंडीग नोंदणीसाठी शिबीराचे आयोजन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा-जिल्हाधिकारी

प्रधानमंत्री किसान सन्मान योजना - ई-केवायसी व आधार सिंडीग नोंदणीसाठी शिबीराचे आयोजन

international yoga day

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विविध कार्यक्रम

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.