• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

शासन आपल्या दारी : बार्शी टाकळी येथे दीड हजार लाभार्थ्यांना मिळाला लाभ

Our Media by Our Media
June 16, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, बातम्या आणि कार्यक्रम, महाराष्ट्र, योजना, राज्य, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
87 1
0
विशेष लेखः- ‘शासन आपल्या दारी’ विविध दाखले, योजनांचे लाभ…एकाच ठिकाणी
13
SHARES
630
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.१६ :  शासकीय योजनांचा लाभ अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी ‘शासन आपल्या दारी’, हे अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत आज बार्शीटाकळी येथे  आयोजित  शिबिरात दीड हजार लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला,असे तहसिलदार दीपक बाजड यांनी कळविले आहे.

आ. हरिष पिंपळे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते. पंचायत समिती सभापती सुनंदा मानतकर,उपसभापती संदीप चौधरी, नगराध्यक्ष मेहबुब खा रसूल खान, जिल्हा परिषद सदस्य गोपाल  भटकर, उपविभागीय अधिकारी संदीप अपार, तहसिलदार दीपक बाजड, तालुका कृषी अधिकारी विलास वाशिमकर, आदिवासी विकास विभाग प्रकल्प अधिकारी राजेंद्र हिवाळे तसेच विविध विभागप्रमुख आदी उपस्थित होते.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

राज्यगीत होऊन दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी शासनाच्या विविध विभागाच्या योजनांचे पात्र लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले. त्यात महिला बालविकास विभाग, कृषी विभाग, सामाजिक न्याय विभाग, महसूल , ग्रामविकास, आरोग्य, आदिवासी विकास विभाग, उद्योग विभाग, पोलीस विभाग, भारतीय स्टेट बॅंक, जिल्हा बॅंक अशा विविध विभागांच्या योजनांच्या लाभांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या ठिकाणी सर्व विभागांनी आपापल्या विभागांच्या योजनांची माहिती देण्यासाठी व लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी स्टॉल्स लावले होते. त्यात लोकांना ७/१२, फेरफार नोंदी, शेतरस्त्याचे सामंजस्याने सोडविण्यात आलेल्या प्रकरणातील आदेश, जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, नॉन क्रिमीलेयर दाखले,  अधिवास, रहिवास दाखले, जॉब कार्ड वाटप, अंत्योदय रेशन कार्ड, संजय गांधी निराधार योजनेच्या पात्र लाभार्थ्यांचे आदेश, अनाथ बालकांचे प्रमाणपत्र,  कृषी विभागामार्फत ट्रॅक्टर,  आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना बि-बियाणे वाटप असे विविध लाभ देण्यात आले.

आ. पिंपळे म्हणाले की, शासन आपल्या दारी हे शिबिर म्हणजे शासन, प्रशासन आणि जनता यांचा दुग्धशर्करा योग होय. यामुळे सर्व विभाग एकत्रितरित्या एकाच ठिकाणी जनतेसाठी उपलब्ध असतात. जनतेची सर्व कामे एकाच ठिकाणी होतात. जनतेचा वेळ वाचतो. या उपक्रमामुळे जनतेच्या कामांचा गती मिळेल.  लोकांकडून आलेल्या सर्व अर्जांचा निपटारा प्रशासनाने करावा,अशी सुचनाही त्यांनी यावेळी केली. या शिबिराचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन आ. पिंपळे यांनी नागरिकांना केले.

आभार प्रदर्शन निवासी नायब तहसिलदार हर्षदा काकड यांनी केले.

Previous Post

बिपरजाॅय शमले, आता मान्सून वेग घेणार, राज्यात ढगांची गर्दी, गार वारेही सुटले

Next Post

विद्यार्थ्यांनो, समजून घ्या : कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची आवड आणि प्रवेशाचे वास्तव

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
विद्यार्थ्यांनो, समजून घ्या : कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची आवड आणि प्रवेशाचे वास्तव

विद्यार्थ्यांनो, समजून घ्या : कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची आवड आणि प्रवेशाचे वास्तव

गायींची कत्तल करुन गोमास विक्री केल्या प्रकरणात अकोट येथिल आरोपीचा अटकपूर्व जामीन नामंजुर

गायींची कत्तल करुन गोमास विक्री केल्या प्रकरणात अकोट येथिल आरोपीचा अटकपूर्व जामीन नामंजुर

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.