नवी दिल्ली : केंद्र सरकारी कर्मचार्यांच्या हाती लवकरच 8 व्या वेतन आयोगाचा जॅकपॉट लागणार आहे. हा केवळ चर्चेचा विषय नव्हे, तर कर्मचार्यांनी मागणी रेटून धरल्यामुळे याविषयीचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. लोकसभेच्या निवडणुका तोंडावर असल्याने मोदी सरकारकडून 8 वा वेतन आयोग स्थापन करण्याविषयी हालचाली सुरू झाल्या आहेत. 8 व्या वेतन आयोगामुळे कर्मचार्यांच्या मासिक वेतनात मोठी वाढ होणार आहे. वेतनवाढीची पूर्ण जबाबदारी वेतन आयोगावर असेल. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी वेतन आयोगाचे अध्यक्ष त्याची घोषणा करतील.
किती वाढेल पगार?
8 व्या वेतन आयोगात कर्मचार्यांचा फिटमेंट फॅक्टर 3.68 पटीने वाढेल. तसेच मूळ वेतनात 44.44 टक्के वाढ होऊ शकते. कॅबिनेटने डीए मंजूर केल्यानंतर महागाई भत्त्यात मोठी वाढ होईल. तसेच कर्मचार्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याची थकबाकी मिळेल. 4 टक्के डीए वाढल्याने कर्मचार्यांच्या पगारात 720 रुपये प्रतिमहिन्यापासून ते 2,276 रुपये प्रतिमहिना असा मोठा फायदा होईल.
संभाव्य वेतनवाढीचे स्वरूप
कर्मचार्याचे मूळ वेतन 18,000 रुपये असेल, तर साधारणपणे त्याच्या पगारात 720 रुपये प्रतिमहिना वाढ होईल. कर्मचार्याच्या वेतनात वार्षिक एकूण 8,640 रुपयांची वाढ होईल. कर्मचार्याचे मूळ वेतन 56,900 रुपये प्रतिमहिना असेल, तर त्याच्या वेतनात अंदाजे दरमहा 2,276 रुपये वाढ होईल. वार्षिक एकूण 27,312 रुपयांची वाढ होईल.