अकोला,दि. 14 : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम.किसान) योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सन्माननिधी दिल्या जातो. या योजनेचा लाभ घेण्याकरिता ई -केवायसी व आधार सिडींग पूर्ण करणे आवश्यक असून ज्या शेतकरी लाभार्थ्यांनी ई-केवायसी व आधार सिडींग पूर्ण केली नाही त्यानी जवळच्या सेतु केंद्र किंवा पीएम किसान ॲपच्या माध्यमातून नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.
शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा चौदावा हप्ता जून महिन्यात देण्यात येणार आहे. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांना चार महिन्यांनी प्रत्येकी दोन हजार रूपयेप्रमाणे वार्षिक सहा हजार रूपये आर्थिक मदत दिली जाते. आतापर्यंत 13 हप्ते पात्र लाभार्थ्यांना देण्यात आले आहेत. तथापि चौदावा हप्ता देण्यासाठी लाभार्थांना ई-केवायसी व आधार सिडींग पूर्ण करणे गरजेचे आहे. ज्या लाभार्थीनी ई-केवायसी व आधार सिडींग पूर्ण केले नाही त्यांना चौदावा हप्ता मिळणार नाहि.
पोर्टलवर नोंदणी करण्याची प्रक्रिया : पी.एम.किसान पोर्टलवर फार्मर कॉर्नर मधील ई-केवायसी-ओटीपी आधारित सुविधेव्दारे ई-केवायसी प्रमाणिकरण करुन घ्यावे किंवा सामाईक सुविधा केंद्रामार्फत(सीएससी) किंवा केंद्र शासनाच्या ॲपव्दारे नोंदणी करावी. तसेच बँक खाते आधार संलग्न करण्यासाठी बँकेत जाऊन बँक खात्यास आधार संलग्न करुन घ्यावे किंवा पोस्टमास्तर यांच्या मार्फत इंडीया पोस्ट पेमेंट बँकेत(IPPB) खाते नोंदणी करावे.
लाभार्थ्यांनी पीएम किसान पोर्टलवर बेनेफिशरी स्टेटस मधून तपासणी करुन ई-केवायसी व आधार सिडींग प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची खात्री करावी. नोंदणीकृत पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी व आधार सिडींग प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.