प्लास्टिकचा अतिरेकी वापर आणि त्यापासून मुक्ती हा विषय दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. प्लास्टिक पृथ्वीवरील प्राण्यांसाठी एक प्रमुख चिंतेचा विषय होत आहे आणि त्याची काळजी घेतली पाहिजे. आपण काय खातो आणि अन्न कसे तयार करतो, याचा पर्यावरणावर महत्त्वपूर्ण प्रभाव पडतो. यावर उपाय म्हणून सरकारबरोबरच सर्वसामान्यांनीही घनकचरा व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
‘प्लास्टिक प्रदूषणावर उपाय’ थीम
पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी जागतिक पर्यावरणदिन 5 जूनला साजरा केला जातो. ‘प्लास्टिक प्रदूषणावर उपाय’ या थीमखाली हा दिवस साजरा होत असून, 2023 मध्ये जागतिक पर्यावरण दिनाचे 50 वे वर्ष आहे.