अकोला,दि.1 : महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत जिल्ह्यातील 734 खातेदांराचे आधारप्रमाणीकरण प्रलंबित आहे. या खातेधारकांनी सोमवार दि. 5 जून पर्यंत आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे, असे आवाहन सहकारी संस्थाचे जिल्हा उपनिबंधक व्हि.आर.कहाळेकर यांनी केले आहे.
पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ सुरु केली आहे. या योजनेचा जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँका, व्यापारी बँका, जिल्हा सहकारी बँक व ग्रामीण बँक यांचेमार्फत 35 हजार 627 कर्जखाती योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आले असून त्यापैकी 21 हजार 266 खात्यांना आजपर्यंत विशिष्ट क्रमांक पोर्टल प्राप्त झाला आहे. त्यापैकी 20 हजार 525 खातेदार शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले असून त्यातील 20 हजार 050 खात्यावरील रु. 87.63 कोटीची कर्ज मुक्तीची रक्कम संबधित खात्यावर जमा करण्यात आली आहे. उर्वरित खात्यांवरील रक्कम प्रक्रियेत आहे. संबधीत बँका व सहकार विभागामार्फत सर्व पात्र खात्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यासाठी अनेक प्रयत्न केल्यानंतर ही आज रोजी जिल्ह्यातील 734 खातेदारांचे आधार प्रमाणीकरण होणे शिल्लक आहे. प्रलंबित आधार प्रमाणीकरण करण्यासाठी सोमवार दि. 5 जून 2023 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. ज्या खातेदारांना विशिष्ट क्रमांक प्राप्त असतांनाही अद्यापपर्यंत आधार प्रमाणीकरण केले नाही अशा शेतकरी बांधवानी आधार प्रमाणीकरणाची शेवटची संधी असून लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्याच्या तक्रारीचा नंतर विचार केला जाणार नाही. लाभार्थ्यांना काही अडचण किंवा शंका असल्यास आपली बँक शाखा अथवा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.