• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 3, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

विशेष लेखः- ‘शासन आपल्या दारी’ विविध दाखले, योजनांचे लाभ…एकाच ठिकाणी

Our Media by Our Media
May 25, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, योजना, राज्य
Reading Time: 1 min read
91 1
0
विशेष लेखः- ‘शासन आपल्या दारी’ विविध दाखले, योजनांचे लाभ…एकाच ठिकाणी
13
SHARES
660
VIEWS
FBWhatsappTelegram

 ‘शासन आपल्या दारी’ या अभियानांतर्गत विविध दाखले, लाभाच्या योजना वितरणासाठी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या महाशिबिरांमध्ये उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक दाखला (महाराष्ट्र राज्य), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक दाखला (केंद्र), विविध प्रकारचे दाखले, सामाजिक सहायता योजना प्रमाणपत्र वितरण आदी सेवा एकाच ठिकाणी देण्यात येणार आहेत. 

या योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता, कागदपत्रे, अर्जपद्धती याबद्दल सामान्यांना पुरेशी माहिती नसते. शिबिराचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता व कागदपत्रांची माहिती करुन देण्याचा हा प्रयत्न.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक कागदपत्रे – तलाठी अहवाल व स्वयंघोषणापत्र, आधारकार्डची छायांकित प्रत, रेशनकार्ड, शुभ्र रेशनकार्ड असल्यास आय टी रिटर्न १६ नं.अर्ज.

जातीचे प्रमाणपत्र आवश्यक कागदपत्रे – शाळा सोडल्याचा दाखला/बोनाफाईट प्रमाणपत्र, रक्तसंबंधित नातेवाईकांचा मानिव दिनांकाचा पुरावा, कुटुंबातील एकाचे जात प्रमाणपत्र असल्यास स्वयंघोषणापत्र.

रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक कागदपत्रे – शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला/ बोनाफाईट प्रमाणपत्र, रेशनकार्ड, आधारकार्ड छायांकित प्रत, लाईट बिल.

नॉनक्रिमीलेअर आवश्यक कागदपत्रे – शाळा सोडल्याचा दाखला/बोनाफाईट, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, रेशनकार्ड, स्वयंघोषणापत्र.

राज्य आर्थिक दुर्बल घटक प्रमाणपत्र आवश्यक कागदपत्रे – शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्न ८ लाखाच्या आतील असल्याचे उत्पन्न प्रमाणपत्र, १९६७ चा पुरावा, स्वयंघोषणापत्र, परिशिष्ट.

केंद्र आर्थिक दुर्बल घटक प्रमाणपत्र आवश्यक कागदपत्रे – शाळा सोडल्याचा दाखला, ८ लाख आतील उत्पन्न प्रमाणपत्र, १९६७ चा पुरावा, स्वयंघोषणापत्र,

परिशिष्ट सामाजिक सहाय्यता कार्यक्रमांतर्गत विशेष सहाय्य योजना संजय गांधी निराधार अनुदान योजना (सर्वसाधारण/अनु. जाती/अनु.जमाती) – निराधार विधवा, परितक्त्या, घटस्फोटीत महिला, अपंग, दुर्धर आजाराने पीडित व्यक्ती, अनाथ मुले/मुली, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नी, तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याची पत्नी यांना या योजनेचा लाभ देय आहे. त्यासाठी रहिवासी दाखला, इतर सर्व लाभार्थ्यांकरिता रु. २१०००/- व दिव्यांग लाभार्थ्यासाठी रु. ५००००/- उत्पन्न दाखला, वयाचा दाखला, दिव्यांग प्रमाणपत्र, असमर्थतेचा/रोगाचा दाखला, अनाथ असल्याचा दाखला, आधार कार्डची छायांकित प्रत, बँक पासबुक (राष्ट्रीयकृत बँक), रेशन कार्ड ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

या योजनेतून दरमहा रक्कम रु. १०००/- (प्रती लाभार्थी), अपत्यहिन विधवा लाभार्थ्यास दरमहा रू.१०००/- एक अपत्य असलेल्या विधवा लाभार्थ्यास दरमहा रू.११००/-, २ अपत्ये असलेल्या विधवा लाभार्थ्यास दरमहा रू.१२००/- अनुदान देय आहे.

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना (सर्वसाधारण/अनु. जाती/अनु.जमाती) – वय वर्ष ६५ पूर्ण असलेले निराधार स्त्री / पुरुष यांना या योजनेचा लाभ देय आहे.

यासाठी रहिवासी दाखला, इतर सर्व लाभार्थ्यांसाठी रु. २१०००/- व दिव्यांग लाभार्थ्यासाठी रु. ५००००/- उत्पन्न दाखला, वयाचा दाखला, दिव्यांग प्रमाणपत्र, असमर्थतेचा/रोगाचा दाखला, आधार कार्डची छायांकित प्रत, बँक पासबुक (राष्ट्रीयकृत बँक), रेशन कार्ड ही कागदपत्रे आवश्यक आहेत.  या योजनेतून दरमहा रक्कम रु १,०००/- (प्रति लाभार्थी), अपत्यहिन विधवा लाभार्थीस दरमहा रु.१०००/-, एक अपत्य असलेल्या विधवा लाभार्थ्यास दहमहा रु. ११००/-,  २ अपत्ये असलेल्या विधवा लाभार्थ्यास दरमहा रू. १२००/ अनुदान देय आहे.

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना (केंद्र पुरस्कृत योजना) – वय वर्ष ६५ व अधिक असलेले स्त्री / पुरुष यांना या योजनेचा लाभ देय आहे.

यासाठी रहिवासी दाखला, दारिद्र्यरेषेचा दाखला, वयाचा दाखला, आधार कार्डची छायांकित प्रत, बँक पासबुक (राष्ट्रीयकृत बँक), रेशन कार्ड ही कागदपत्रे आवश्यक आहेत. या योजनेतून दरमहा रक्कम रु. १०००/- प्रती लाभार्थी (वय वर्ष ६५ ते ७९ राज्य शासन ८०० + केंद्र शासन २००) (वय वर्ष ८० व अधिक राज्य शासन ५०० + केंद्र शासन ५००) अनुदान देय आहे.

इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना (केंद्र पुरस्कृत योजना) – वय वर्ष ४० ते ७९ वयोगटातील विधवा स्त्रियांना या योजनेचा लाभ देय आहे. यासाठी रहिवासी दाखला, दारिद्र्यरेषेचा दाखला, वयाचा दाखला, आधार कार्डची छायांकित प्रत, बँक पासबुक (राष्ट्रीयकृत बँक), रेशन कार्ड, पतीचा मृत्यू दाखला ही कागदपत्रे आवश्यक आहेत. या योजनेतून दरमहा रक्कम रु. १०००/- प्रती लाभार्थी (राज्य शासन ७०० + केंद्र शासन ३००) अनुदान देय आहे.

इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना (केंद्र पुरस्कृत योजना) – वय वर्ष १८ ते ७९ वयोगटातील दिव्यांगांना या योजनेचा लाभ देय आहे. यासाठी रहिवासी दाखला, दारिद्र्यरेषेचा दाखला, वयाचा दाखला, आधार कार्डची छायांकित प्रत, बँक पासबुक (राष्ट्रीयकृत बँक), रेशन कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र ही कागदपत्रे आवश्यक आहेत. या योजनेतून दरमहा रक्कम रु. १०००/- प्रती लाभार्थी (राज्य शासन ७०० + केंद्र शासन ३००) अनुदान देय आहे.

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना (केंद्र पुरस्कृत योजना) – वय वर्ष १८ ते ५९ वयोगटातील कर्ता स्त्री/पुरूष मरण पावल्यास वारसांना या योजनेचा लाभ देय आहे. यासाठी वयाचा दाखला, रहिवास प्रमाणपत्र, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाचा पुरावा, मृत्युचा दाखला ही कागदपत्रे आवश्यक आहेत. या योजनेतून मयत व्यक्तिच्या वारसाला एकदाच एकरकमी रक्कम रु. २००००/- अनुदान मिळते.

या सर्व योजनांचा साभ घेण्यासाठी तालुक्यासाठी संबंधित तहसिलदार आणि महानगर पालिका क्षेत्राकरिता तहसिलदार शहर संजय गांधी कार्यालय, सोलापूर येथे अर्ज करावा. किंवा लाभार्थ्यांनी अर्ज महा-ई-सेवा केंद्र अथवा समक्ष तहसिल कार्यालयात सादर करणे अनिवार्य आहे.

या सामाजिक सहाय्यता योजनांच्या माध्यमातून समाजातील निराधार, गरजू व्यक्तिंना आर्थिक मदत व आधार मिळत आहे.  एकूणच शासन आपल्या दारीअंतर्गत महाशिबिरांतून महसूल विभागामार्फत देण्यात येणारे विविध प्रकारचे दाखले व सेवा यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, विविध प्रकारची प्रमाणपत्रे, अनुज्ञप्ती व अन्य सेवांसाठी विविध शासकीय कार्यालयात जाण्याचा वेळ वाचावा व लोकांना विनाविलंब सेवा मिळावी हा या अभियानाचा उद्देश आहे. महाशिबिराच्या माध्यमातून एकाच छताखाली कमी वेळेत या सेवा दिल्या जाणार आहेत. याचा लाभ गरजूंनी घ्यावा.

Previous Post

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग पूर्व परीक्षा दि.४ जून रोजी जिल्ह्यात १६ उपकेंद्रांवर सज्जता परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

Next Post

‘प्रधानमंत्री कुसुम-ब योजना’ : कृषीपंप सौरऊर्जा विद्युतीकरणासाठी ऑनलाईन अर्ज सुविधा उपलब्ध

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
राज्यात ७००० सौर कृषी पंपांना मंजुरी

‘प्रधानमंत्री कुसुम-ब योजना’ : कृषीपंप सौरऊर्जा विद्युतीकरणासाठी ऑनलाईन अर्ज सुविधा उपलब्ध

भारतीय चलनात नव्याने ७५ रूपयांचे नाणे समाविष्ट होणार जाणून घ्या काय असेल त्यात खास

भारतीय चलनात नव्याने ७५ रूपयांचे नाणे समाविष्ट होणार जाणून घ्या काय असेल त्यात खास

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.