तेल्हारा प्रतिनिधी :-लोकजागर मंचच्या वतीने तेल्हारा शहरात प्रथमच आयोजन करण्यात आलेल्या भव्य जत्रा महोत्सवात महिला बचत गटांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हा असे उदगार तेल्हारा येथील पत्रकार परिषदेत लोकजागर मंचचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री अनिल गावंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना काढले.यावेळी लोकजागर मंच्याच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला लोकजागर मंचचे तेल्हारा तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
अनिल गावंडे बोलतांना पुढे म्हणाले की महिला बचत गटांना सक्षम करण्यासाठी त्यांनी तयार केलेल्या तयार केलेल्या उत्पादनाला वाव व योग्य बाजारपेठ तसेच महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी या तेल्हारा जत्रेचे आयोजन करण्यात आले असून महिला बचत गटांची वेगळी ओळख या माध्यमातून निर्माण होणार आहे.तेल्हारा जत्रेचे आयोजन तेल्हाऱ्याच्या धर्तीवर प्रथमच होत आहे . यामध्ये नातवांपासून आजी आजोबांना एकच ठिकाणी खिळवून ठेवणारी ही अभूतपूर्व जत्रा आहे यामध्ये कला , खानपान, व संस्कृती, खरेदी , आत्मनिर्भरता , रोजगार ,पारंपरिक खेळ, देशी बियाण्याचे विविध प्रकारचे बियाणे , सोबतच खेळ , खेळणी ,विरंगुळा , मनोरंजन, जादूचे प्रयोग , शिवाय तुफान विनोदासह दररोज सांस्कृतिक मेजवानी असा भरगच्च कार्यक्रम तेल्हारा येथिल सेठ बन्सीधर विद्यालयाच्या प्रांगणात दि ,27 व 28 मे ला सायंकाळी 6 ते रात्री 10 या वेळात आयोजित केला आहे. त्यामुळे तालुक्यातील महिला बचत गटांनी या जत्रेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपण बनवत असलेल्या वस्तूची दुकाने लावावी असे लोकजागर मंचचे संस्थापक अध्यक्ष अनिल गावंडे यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद करतांना सांगितले .