अकोला दि. 17 : आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीत (आरटीपीसीआर) 72 जणांचा अहवाल प्राप्त झाला. त्यात दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयामार्फत कळविण्यात आले आहे.
आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 2 व खाजगी 0)2+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह 2.
आरटीपीसीआर ‘दोन’
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतील कोरोना संसर्ग तपासणी अहवालात दि. 10 ते 16 मे कालावधीत कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नव्हता. तथापि आज(दि.17) आरटीपीसीआर चाचण्यात दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात एक महिला व एक पुरुष रुणाचा समावेश असून हे रुग्ण मुर्तिजापूर येथील रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातून मिळाली.
सक्रिय रुग्ण ‘दोन’
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 66212(50079+15142+991) आहे. तर सद्यस्थितीत जिल्ह्यात दोन सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातून देण्यात आली आहे.