• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 10, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा 2023-24 बोगस बियाणे विक्रेत्यांवर कारवाई करा – आ.रणधीर सावरकर

Our Media by Our Media
June 1, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, शेती
Reading Time: 1 min read
85 1
0
तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा 2023-24 बोगस बियाणे विक्रेत्यांवर कारवाई करा – आ.रणधीर सावरकर
12
SHARES
612
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.15 :  शेजारील राज्यातून खोटे बीटी बियाणे विक्रीसाठी येण्याची शक्यता लक्षात घेता कृषी विभागाने दक्ष राहावे. अशा बोगस बियाणे विक्रेत्यांवर कारवाई करावी, असे निर्देश आमदार रणधीर सावरकर यांनी खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत दिले.

अकोला तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा सभा आमदार रणधीर सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. या सभेस पंचायत समिती सभापती सुलभा सोळंके, जि.प. सदस्य शिवा मोहोड, पुष्पा इंगळे, शंकरराव इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, तालुका कृषी अधिकारी शशिकांत जांभुरुणकर, तसेच सर्व मंडळ अधिकारी, कृषिसेवक आदी उपस्थित होते.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

बैठकीच्या प्रारंभी तालुका कृषी अधिकारी जांभुरुणकर यांनी तालुका खरीप हंगाम पूर्व तयारी आढाव्याचे सादरीकरण केले. त्यात दिलेल्या माहितीनुसार,

खरीप पेरणीचे नियोजन- जिल्ह्यात एकूण 92 हजार 288 हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. पिकनिहाय क्षेत्र व अपेक्षित उत्पादन याप्रमाणे-  सोयाबीन 40 हजार 350 हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे नियोजन असून 1 हजार 682 किलो/हेक्टर  उत्पादन अपेक्षित आहे. कापूस 30 हजार हेक्टरमध्ये 1 हजार 120 किलो/हेक्टर, तूर 11 हजार 308 हेक्टरमध्ये 874 किलो/हेक्टर, मूग 1 हजार 150 हेक्टरमध्ये 211 किलो/हेक्टर, उडीद 700 हेक्टरमध्ये 386 किलो/हेक्टर, तुर 11 हजार 308 हेक्टरमध्ये  874 किलो/हेक्टर याप्रमाणे लागवड क्षेत्र व उत्पादन अपेक्षित आहे.

आमदार रणधीर सावरकर यांनी निर्देश दिले की, ज्वारी उत्पादन क्षेत्र वाढवण्याचे आवश्यक असून याकरिता शेतकरीबांधवाना प्रोत्साहित करावे. याकामी कृषिसेवकांना लक्षांक निर्धारित करुन द्यावे. मागील हंगामात तुरीवर कीड प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात होऊन तुर पिकांचे नुकसान झाले होते. हे बाब लक्षात घेऊन हंगामापूर्वी तयारी करावी.  कीड प्रार्दुभाव कमी करण्यासाठी नॅनो युरिया अत्यंत प्रभावी आहे. याचा प्रचार व प्रसार करुन त्याचे फायदे शेतकरी बांधवापर्यंत पोहोचावे. खरीप हंगामाकरिता प्रमाणित बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध होईल याची खातरजमा करावी. बाहेर राज्यातून येणारी बोगस बियाणे विक्री होणार नाही, याची दक्षता घ्यावी. अशा बियाण्याची विक्री करणाऱ्या निविष्ठाधारकांवर तातडीन कारवाई करावी, असे निर्देश दिले.

जलयुक्त शिवारअंतर्गत अकोला तालुक्यातील निवड झालेल्या गावातील शेततळ्यांचे  कामे प्राधान्याने हाती घेऊन ते पूर्ण करा. या योजनेतील नाले, जलाशय यात तयार झालेल्या गाळ काढण्याचीही कामे पूर्ण करा.  मागील वर्षातील पिक विमासंदर्भातील प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गी लावा. तसेच आंतरराष्ट्रीय कडधान्य मोहिमेअंतर्गत राबविलेल्या मोहिमेची सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश यावेळी आमदार सावरकर यांनी दिले. शेतकरी बांधवानी घरचे बियाणे वापरावे याकरिता प्रोत्साहित करावे. याकरिता शेतकऱ्यांना उगवण क्षमतासंदर्भात कृषीसेवकांनी मार्गदर्शन करावे. कृषी विभागाने याकामी निःस्वार्थ व पूर्ण क्षमतेने शेतकऱ्यांना सहकार्य करावे, असे निर्देश यावेळी दिले.

Previous Post

आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनीला काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव शासनाकडे शेतकऱ्यांचे दावे ५ जून पर्यंत स्विकारणार

Next Post

IPL 2023 : ऑटोग्राफ प्‍लीज..! गावस्कर झाले धोनीचे फॅन

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
IPL 2023 : ऑटोग्राफ प्‍लीज..! गावस्कर झाले धोनीचे फॅन

IPL 2023 : ऑटोग्राफ प्‍लीज..! गावस्कर झाले धोनीचे फॅन

Nima Arora

मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांचा समन्वय व संपर्क आवश्यक-जिल्हाधिकारी निमा अरोरा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.