पुणे दि 04 : नॅशनल डिफेन्स अकादमीमधील दोन सुपर डेमोना विमानांसह नॅशनल डिफेन्स अकादमीमधील एअरफोर्स ट्रेनिंग टीम (एएफटीटी) कडून हवेत उड्डाण केले. भारतीय सशस्त्र दलांच्या लष्करी नेत्यांच्या 75 गौरवशाली वर्षांच्या स्मरणार्थ, ’फोर्जिंग जॉइंट मिलिटरी लीडरशिप’ या थीमचा एक भाग म्हणून राष्ट्रीय संरक्षण अकादमीने एअरफोर्स अकादमीला क्रॉसकंट्री फ्लाइटने सुरुवात केली. एनडीएचे डेप्युटी कमांडंट आणि मुख्य प्रशिक्षक मेजर जनरल संजीव डोगरा यांनी या फॉर्मेशनला हिरवा झेंडा दाखवला.
बुधवारी (दि. 3) सकाळी एनडीए ते सोलापूर अशी फेरी सुरू झाली. एनडीएचे कॅडेट आणि प्रशिक्षक सोलापूर येथे एनसीसी कॅडेट्सशी संवाद साधल्यानंतर फॉर्मेशन एअर फोर्स स्टेशन बीदरकडे जातील. गुरुवारी (दि. 4) एनडीएच्या प्रशिक्षकांसह कॅडेट्स दुंडीगल, हैदराबाद येथील वायुसेना अकादमीला जातील आणि एएफएच्या कॅडेट्सशी संवाद साधतील. शुक्रवारी (दि.5 ) या महान संस्थेची त्रि-सेवा मूल्ये आणि नैतिकता दर्शविणारे हे उड्डाण एनडीए येथे परततील. सुपर डिमोना विमानातून 6 कॅडेट आणि 2 प्रशिक्षक हे 1400 कि. मी. अंतर कापणार आहेत. हेच वैमानिक भारतीय हवाई दलाचे भविष्यातील लढाऊ विमानचालक बनणार आहेत.