अकोला,दि.३ : प्रादेशिक मौसम विभाग नागपुरद्वारे प्राप्त संदेशानुसार दि.३ ते दि.७ पर्यंत विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या कालावधीत सावधानतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. जिल्ह्यातिल शेतकऱ्यांनी आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. बाजार समितीत असणाऱ्या शेतमालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. वीज व गारांपासून बचाव करण्यासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. वादळाच्या स्थितीत झाडाखाली आश्रय घेऊ नये. जनावरांनाही सुरक्षित निवारा द्यावा. सावधानता तसेच खबरदारी बाळगावी,असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.