अकोला,दि.१३ -: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास अकोला विमानतळ येथे आगमन झाले.
विधानसभा सदस्य आ. गोवर्धन शर्मा, आ. प्रकाश भारसाकळे तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी शरद जावळे, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश जोशी तसेच अन्य अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले. लगेचच ते हेलिकॉप्टरने रिसोड जि. वाशीम कडे रवाना झाले.