• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

विशेष लेख : शेळ्यांचे उन्हाळ्यातील व्यवस्थापन

Our Media by Our Media
April 3, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, ठळक बातम्या, फिचर्ड, राज्य, विदर्भ
Reading Time: 1 min read
91 1
0
शेळी निवारा
13
SHARES
658
VIEWS
FBWhatsappTelegram

शेळी हि बहुउद्देशीय कारणासाठी पाळली जाते. जसे मास, दूध, चमडा, तंतू आणि शेतीसाठी उपयुक्त असे शेळ्यांचे लेंडीखत. भारतामध्ये ग्रामीण भागामध्ये गरीब शेतकरी आणि मजूर यांच्या उत्त्पन्न आणि उपजिविकेसाठी शेळीपालनाचे  लक्षणीय असे योगदान आहे. मागील काही दशकापासून शेळ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे. शेळीच्या रुचकर मांसामुळे देशात आणि विदेशी बाजारपेठेत शेळीच्या मांसास मागणी वाढली असून त्याप्रमाणात उत्पादन कमी आहे. तसेच शेळीचे दुध लहान बालके, वृद्ध, आजारी व्यक्ती यांना पचण्यास सोपे आणि पोषक आहे. आयुर्वेदामध्ये शेळीच्या दुधाचा उपयोग अस्थमा, खोकला आणि साखऱ्या या रोगामध्ये होत असल्याने शेळीच्या दुधासही बाजारात मागणी वाढली असून शेळीचे दुध चढ्या दराने विक्री होत आहे. महाराष्ट्रात सर्वसाधारणत: शेळ्या या चराई पद्धतीवर पाळल्या जातात. त्यात त्यांना रोज चरण्यासाठी किमान 8 ते 9 किलोमीटर चालावे लागते. उन्हाळ्यात बहुतांश वेळी चराई क्षेत्रावर चरण्यासाठी खूप कमी व निकृष्ठ  प्रतीचा चारा शिल्लक असतो. अश्यावेळी शेळ्याची बरीच शक्ती चालण्यात जाते आणि त्यांना पोटभर अन्नही मिळत नाही तसेच उन्हात चरण्यामुळे त्यांना भीषण  उष्ण तापमानाचा सामना कारावा लागतो आणि त्यांना उष्णतादाह होण्याची शक्यता असते. तसेच शेळ्यांच्या वाढ, उत्पादन व प्रजोत्पादनात घट येते. काही वेळा शरीरातील पाणी कमी होऊन त्या दगावण्याची शक्यताही वाढते आणि व्यवसायात तोटा संभवतो. म्हणून शेळ्यांचे उन्हाळ्यातील व्यवस्थापन या व्यवसायातील वृद्धीसाठी अत्यंत महत्वाचे आहे.

शेळ्यांमधील उष्णतादाहाची लक्षणे

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेळ्या सावलीत राहणे पसंत करतात, खाद्य खाणे कमी करते, पाणी पिण्याचे प्रमाणात वाढते, अस्वस्थता वाढते श्वासोच्छवास वाढतो, शेळ्या तोंड उघडून श्वास घेतात हृदयाचे ठोके वाढतात, घामाचे प्रमाण वाढते, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते, लघवी करण्याचे प्रमाण कमी होते, शेळ्याच्या मासाची गुणवत्ता खराब होते.

शेळ्यांचे उन्हाळ्यातील व्यवस्थापनासंबंधी सूचना

निवारा: उन्हाळ्यात उष्णतेपासून शेळ्यांचा बचाव होण्याकरिता त्यांच्या करिता निवारा असणे गरजेचे आहे. बांबू, लाकडे, वाळलेले गवत, तुराटया इ. च्या सहाय्याने शेळ्यांसाठी कमी खर्चात निवारा तयार करता येऊ शकतो.  असा तात्पुरता निवारा जमिनीपासून 7 ते 8 फुट उंच असावा. उन्हाळ्यामध्ये शेळ्याच्या लेंड्यापासून अमोनिया जास्त प्रमाणात बाहेर पडतो त्यामुळे गोठ्यातील हवा खेळती राहणे आवश्यक आहे.  निवाऱ्यात शेळ्यांना थंडावा वाटावायाकरिता निवाऱ्याच्या उघड्या बाजूस सुतीकापड किंवा ग्रीनगार्डन नेट किंवा सुतीपोती लावून घ्यावी व त्यावर पाणी शिंपडून घ्यावे. पक्के गोठे असतील तर गोठ्यात फोगर (बाष्पक) आणि हवा खेळती राहावी याकरिता पंखे बसवून घ्यावेत. गोठ्यामध्ये शेळ्यांना पुरेशी जाग उपलब्ध करून दिल्यास गोठ्यातील तापमान वाढत नाही याकरिता प्रत्येक शेळीला सुमारे 15 चौरस फुट जागा हवी असते. एका गोठ्यात 50-60 पेक्षा अधिक शेळ्यांना ठेवू नये. गोठ्याचे छत पक्के असेल(सिमेंट कॉंक्रीट किंवा पत्रे) तर गोठ्याच्या छतास चुना किंवा पांढऱ्या पेंटचा जाड थर मारून घ्यावा ज्यामुळे आतील तापमान 2 ते 3 अंश सेल्सीअस ने कमी होण्यास मदत होते.

चराई व्यवस्थापन: शेळ्यांना चरण्याकरिता सकाळी लवकर(5 ते 9 दरम्यान) आणि  सायंकाळी उशिरा (5 ते 8 दरम्यान) चराईसाठी सोडावे. शक्य नसल्यास चराई क्षेत्रावर त्यांना दुपारी 12 ते 4 या वेळेत दाट सावलीच्या  झाडाखाली ठेवावे.

शेळ्यांकरिता पिण्याचे पाणी: सर्वसाधारणत  शेळ्यांना पिण्याकरिता दररोज 5 ते 7 लिटर पाणी लागते परंतु उन्हाळ्यात त्यांना 15 ते  20 लिटर पाणी लागते. किंवा प्रति एक किलो शुष्क चाऱ्यामागे 4 लिटर पाणी देणे आवश्यक आहे. बंदिस्त शेळीपालनात पिण्याचे मुबलक स्वच्छ ताजे पाणी 24 तास उपलब्ध करून द्यावे. पिण्याच्या पाण्याचे तापमान 20 ते 24 अंश सेल्सीअस असावे. उन्हाळ्यात शेळ्यांना पिण्यासाठी माठ किंवा रांजणातील पाणी दिल्यास ते पाणी शेळ्या आवडीने पितात.

खाद्य व्यवस्थापन : शेळ्यांकरिता दिल्या जाणाऱ्या दैनंदिन आहारात सकस हिरव्या चाऱ्याचा आविर्भाव असावा. प्रत्येक मोठ्या शेळीस 3 ते 5 किलोग्राम हिरवा चारा मिळेल असे नियोजन उन्हाळ्याआधीच करून ठेवावे. त्यासोबतच 200 ते 300 चांगल्या प्रतीचे पशुखाद्यही पुरविण्यात यावे. हिरवा चारा कमी उपलब्ध असल्यास हिरवा-सुका चारा आणि पशुखाद्य सोबत मिसळून ओले मिश्रण तयार करून संमिश्र खाद्य दिल्यास त्यांचे खाद्य सेवन वाढते.  चारा आणि पशुखाद्याचे प्रमाण हे 50:50 असावे. उपलब्ध असलेला हिरवा चारा शेळ्यांना द्यावा. मांस वाढीसाठी आवश्यक घटक चाऱ्यातून मिळत नाहीत. त्यामुळे चाऱ्यामध्ये इतर घटक जसे क्षार मिश्रण, जीवसत्वे, प्रोबायोटिक्स यांचा वापर करावा.

बंदिस्त शेळीपालनातील शेळ्यांना दिला जाणारा दैनंदिन आहार हा 3 ते 4 भागात विभागून सकाळी आणि सायंकाळच्या वेळी देण्यात यावा.

प्रोबायोटीक्सच्या वापरामुळे ओटी पोटाला आवश्यक असणारे सूक्ष्मजीव मिळून पचनक्रिया जलद होते. यामुळे मांस उत्पादन वाढते तसेच शेळीची प्रकृती चांगली राहते. प्रोबायोटीक्स हे लहान शेळ्याच्या पिलांना 2.5 ग्राम प्रत्येक दिवशी आणि 5  ग्राम  प्रजनन किंवा उत्पादनासाठी असलेल्या शेळ्यांमध्ये द्यावे. शेळ्यांच्या आहारातील स्निग्धाचे प्रमाणहे 3 ते 5 टक्के एवढे ठेवता येते. स्निग्धाचे प्रमाण हे 5 टक्कके पेक्षा अधिक नसावे. शेळ्यांच्या आहारात मेथीच्या बिया 10 ग्राम प्रति दिवस आणि चांगल्या प्रतीचे प्रोबायोटिक्स 2 ग्राम प्रति दिवस याप्रमाणे समावेश केल्यास शेळ्यांची वाढ व्यवस्थित होण्यास मदत होते. तसेच दुध देणाऱ्या शेळ्यांचे दुध उत्पादन देखील वाढते. खाद्यासोबत पूरक म्हणून लहान शेळ्यांना पाण्यासोबत ईलेक्ट्रोलायीट पावडर पाण्यात मिसळून द्यावे. ज्याचे पाण्यात विरघळल्यास आयन तयार होतात आणि जीवनसत्त्वे हे पाण्यात दोन चमचे मिसळावे. ज्यामुळे उन्हाळ्यात लहान शेळ्यांच्या शरीरातील पाणी कमी होणार नाही. उष्णतेमुळे  शेळ्यांच्या तोंडाला पुरळ येतात. त्यासाठी  सब्जाच्या बिया तुळस ज्याला उत्तम तुळशी देखील म्हणतात त्या  पाण्यामध्ये टाकून मिसळून घ्यावे आणि ते दुपारी अधिक उष्णतेच्या काळात शेळ्यांना पिण्यास द्यावे. सकाळी लवकर किंवा सायंकाळी थंड वेळेत देऊ नये. कलिंगडचे फळाचे उरलेले टाकाऊ अवशेष शेळ्यांना उन्हाळ्यात अधिक उष्णतेच्या वेळी शेळ्यांना खाण्याकरिता  द्यावे.  शेळ्यांना त्यांच्या प्रति किलो शरीर वजनास 1000 मिली ग्राम या प्रमाणे विटामिन ई आणि सेलेनियम 3 मिली ग्राम प्रति 50 किलो ग्राम शरीर वजनास याप्रमाणे तसेच सी जीवनसत्त्व 100 मिली ग्राम प्रतिकिलो ग्राम शरीर वजनाच्या प्रमाणात दिल्यास उष्णता दाहाचा त्रास कमी होण्यास मदत होते.

उन्हाळ्यातील लसीकरण

आंत्र विषार हि लस वर्षातून एकदा एप्रिलमध्ये दोन मात्रा पंधरा दिवसाच्या अंतराने द्याव्यात, लाळ्या खुरकुत लसीकरण मार्च किंवा एप्रिल महिन्यात तसेच घटसर्प लस वर्षातून एकदा मार्च किंवा एप्रिल महिन्यात देण्यात यावी. लसीकरण करण्याच्या दोन दिवस आधी व नंतर एलेक्त्रोलायीट पावडर, बी कॉम्प्लेक्स द्यावे. यामुळे शेळ्यांवर लसीकरणाचा ताण येणार नाही. तसेच लसीकरण करण्याच्या आठ दिवस आधी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने शेळ्यांना जंतनाशनाचा डोस देऊन घ्यावा.

Previous Post

विशेष लेख :मधमाशी पालन; शेतीपूरक, पर्यावरणपूरक व्यवसाय

Next Post

सैन्यदलातुन निवृत झालेल्या माजी सैनिकांने जिंकलं गाव,माजी सैनिक झाला आळंदा ग्रामदान मंडळाचा अध्यक्ष

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
आळंदा

सैन्यदलातुन निवृत झालेल्या माजी सैनिकांने जिंकलं गाव,माजी सैनिक झाला आळंदा ग्रामदान मंडळाचा अध्यक्ष

जैविक शेती मिशन

विशेष लेख : डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन सकस अन्न, संपन्न शेतकरी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.