• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

विशेष लेख :मधमाशी पालन; शेतीपूरक, पर्यावरणपूरक व्यवसाय

Our Media by Our Media
April 3, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, ठळक बातम्या, फिचर्ड, राज्य, विदर्भ
Reading Time: 1 min read
85 1
0
मधमासी पालन
12
SHARES
612
VIEWS
FBWhatsappTelegram

मधमाशीचे अस्तित्व हे शेती सारख्या परागिभवन या प्रक्रियेचे अत्याधिक महत्त्व असलेल्या व्यवसायासाठी अत्यंत महत्त्वाचे होय. हे एक प्रकारचे सहचर्य होय. मधाचे आहारातील महत्त्व लक्षात घेता, मधाचे उत्पादन हे सुद्धा शेतकऱ्यांना पुरक उत्पन्न मिळू शकते. शेतकऱ्यांमध्ये या पर्यावरणपूरक जोड व्यवसायाची जाणीव जागृती व्हावी म्हणून  महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाअंतर्गत मध उद्योग विकास कार्यक्रम राबविण्यात येतो. विशेषत्वाने डोंगराळ व जंगल विभागातील मधपाळांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हाती घेण्यात आला आहे. मंडळामार्फत मधमाशा पालन उद्योगासाठी मध केंद्र योजना व अर्थसहाय्य / अनुदान ही योजना राबविले जाते. मंडळामार्फत या उद्योगाचे प्रशिक्षण देण्यात येते व सवलतीच्या दरात मध पेट्यांचा, मध यंत्राचा पुरवठा करण्यात येतो. तसेच या उद्योगांतर्गत उत्पादन, संशोधन, मध प्रक्रिया, विक्री, राणी माशी पैदास इत्यादि कार्यक्रमही मंडळामार्फत हमी भावाने हाती घेण्यात येतात.

मधउद्योग हा एक उत्तम ग्रामोद्योग आहे, त्यासाठी जागा, इमारत, वीज, पाणी अशा भांडवली गुंतवणूकीची आवश्यकता नाही. रोजगार निर्मितीची उत्तम क्षमता या व्यवसायात आहे.  असून, वाया जाणाऱ्या नैसर्गिक साधन संपत्तीचा चांगला उपयोग केला जातो. पाळता येणाऱ्या जातीच्या माशा (सातेरी मेलिफेरा), मधमाशांना उपयुक्त असा मकरंद व पराग देणाऱ्या वनस्पतींची उपलब्धता व त्यांच्या फुलोऱ्याचे सातत्य, मधमाशांना हाताळण्याचे व त्या उद्योगातील विविध तंत्राचे ज्ञान प्रशिक्षण, प्रमाणित व योग्य उपकरणांचा पुरवठा, मधमाशांचे रोग, शत्रू व त्यांच्या नियंत्रणाची माहिती या बाबी मधउद्योगासाठी आवश्यक आहेत.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

महाराष्ट्र शासनाने दिनांक १८ जून २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार मध केंद्र योजना (मधमाशा पालन) संपूर्ण राज्यात राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. मधमाशा संरक्षण-संवर्धनासाठी जनजागृती व प्रसार-प्रचार, निःशुल्क प्रशिक्षण व कौशल्य विकास, ५० टक्के अनुदानावर साहित्य वाटप, उत्पादित मधाची मंडळामार्फत खरेदी हमी, उपउत्पादने तयार करण्यासाठी विशेष प्रशिक्षण, उपउत्पादने तयार करणेसाठी ५० टक्के अनुदानावर साहित्य वाटप, मंडळातर्फे उपउत्पादनांच्या खरेदीची हमी, विशेष छंद प्रशिक्षणाची सुविधा ही मधकेंद्र योजनेची वैशिष्ट्ये आहेत.

याअंतर्गत खालीलप्रमाणे प्रशिक्षण दिले जाते

अ) प्रगतीशील मधपाळ व प्रशिक्षण (केंद्रचालक) – केंद्रचालक, मधपाळ. यांना मध संचालनालय महाबळेश्वर येथे २० दिवसांचे निवासी प्रशिक्षण देण्यात येते.

ब) मधपाळ प्रशिक्षण : वैयक्तिक शेतकरी अर्जदार यांना मध संचालनालयामार्फत जिल्ह्याच्या किंवा स्थानिक ठिकाणी १० दिवसाचे निवासी प्रशिक्षण देण्यात येते.

क) मधमाशा पालन छंद प्रशिक्षण: शेतकरी, शाळा, कॉलेज, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, शासकीय सेवेतील अधिकारी/कर्मचारी यांना मधमाशा पालन एक छंद म्हणून ५ दिवस मुदतीचे छंद प्रशिक्षण देण्यात येते.

मधुमक्षिका पालन अर्थसहाय्य, अनुदान

योजने अंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या लाभार्थींना मधमाशा पालन उद्योगासाठी लागणारे मधपेट्या व इतर साहित्याच्या स्वरुपात ५० टक्के टक्के अनुदान देण्यात येते. व उर्वरित ५० टक्के स्वगुंतवणूक लाभार्थीने करणे आवश्यक आहे. मध खरेदी केंद्रचालक व मधपाळ या मधमाशापालन उद्योजकांनी उत्पादित केलेला मध व मेण मध संचालनालयामार्फत हमी भावाने खरेदी केला जातो.

Previous Post

‘सामाजिक न्याय पर्व’; शासनाच्या योजना तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवाव्यात – निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे

Next Post

विशेष लेख : शेळ्यांचे उन्हाळ्यातील व्यवस्थापन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
शेळी निवारा

विशेष लेख : शेळ्यांचे उन्हाळ्यातील व्यवस्थापन

आळंदा

सैन्यदलातुन निवृत झालेल्या माजी सैनिकांने जिंकलं गाव,माजी सैनिक झाला आळंदा ग्रामदान मंडळाचा अध्यक्ष

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.