• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, June 10, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

बेवारस रुग्णाची शस्त्रक्रिया, देखभाल आणि कुटुंबियांशी पुनर्भेट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांची सहृदयता

Our Media by Our Media
March 31, 2023
in Featured, अकोला, आरोग्य, ठळक बातम्या, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
86 1
0
जीएमसी
12
SHARES
619
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.31 :-  एक व्यक्ती अचानक बार्शीटाकळी रेल्वेस्थानकावर जखमी अवस्थेत आढळतो. तो बेवारस म्हणूनच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रेल्वे पोलिसांमार्फत दाखल होतो. डोक्याला मार लागल्याने त्याला काहीच आठवत नाही. महिनाभराचा उपचार,सुश्रूषा, समुपदेशनानंतर तो पूर्ण बरा होतो, आता प्रश्न येतो त्याला सोडायचे कुठे? दरम्यान त्याला काहीही आठवत नाही. पण सारखा आईकडे जायचे असा पाढा लावलेला. आणि मग सुरु होते एक तपास यात्रा आणि आई लेकराची भेट पुन्हा घडवित अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर्स, कर्मचारी सहृदयतेचा प्रत्यय देतात.

बार्शीटाकळी येथील रेल्वेस्थानकावर दि.26 फेब्रुवारी रोजी एक 40 वर्षीय रुग्ण जखमी अवस्थेत रेल्वे रुळावर असल्याचे निदर्शनात आले. हा रुग्ण बेशुद्ध अवस्थेत होता त्याच्या डोक्याला व शरीराच्या बऱ्याच भागात गंभीर जखमा झाल्या होत्या.  रेल्वे पोलीसांनी त्या रुग्णाला तातडीने उपचाराकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. पोलीसांच्या तत्परतेने व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयत्नाने त्या रुग्णाचा जीव वाचविण्यात आला.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

दाखल झाला त्यावेळी या रुग्णाची अवस्था बिकट होती. डोक्याला मार लागल्यामुळे त्याला आपले नाव व पत्ता तसेच नातेवाईकांची माहिती सांगता येत नव्हती. बराच मार लागल्यामुळे त्याला त्या वेदना असह्य होत होत्या. तो प्रचंड चिडचिड व आरडाओरड करत होता. तथापि, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सर्जरी विभाग, अस्थिव्यंगोपचार व मनोविकृती अशा सर्व विभागांनी या रुग्णावर आवश्यक तपासण्या, उपचार, शस्त्रक्रिया केल्या. तब्बल एक महिन्याने हा रुग्ण पूर्ण बरा झाला. मुळात या रुग्णाला अपस्मार हा आजार होता. त्यामुळे त्याचेवर हा प्रसंग गुदरला असावा.

जीव वाचला पण अपघातामुळे या रुग्णाला स्वतःची ओळख नव्हती. त्याला पुढील पुर्नवसनासाठी समाजसेवा अधिक्षक अमोल शेंडे यांच्याकडे पाठविण्यात आले. समुपदेशनादरम्यान हा रुग्ण  वारंवार घरी जाण्याचा आग्रह करित होता. मात्र त्याला घरचा पत्ता आठवत नव्हता. त्यामुळे त्याच्या कोणत्याही नातेवाईकाशी संपर्क करता येत नव्हता. साहजिकच  त्याला घरी कसे पाठवयाचे? हा प्रश्न निर्माण झाला. अशावेळी बार्शीटाकळी रेल्वे पोलीसांशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी रुग्णाची विचारपूस केली. त्याच्याकडून जमा करण्यात आलेल्या एका चिठ्ठीच्या आधारे  हा रुग्ण उत्तरप्रदेशातील इलाहाबाद जिल्ह्यातील  असल्याचा धागा गवसला. त्यांनी तेथील पोलीस कार्यालयाशी संपर्क साधला. अखेर हा तरुण मोहम्मद आरीफ मोहम्मद अख्तर रा. गुलारीया पो.फुलपूर, ता. हांडीया या गावातील असल्याचे उत्तरप्रदेश पोलीसांनी खात्रीपूर्वक सांगितले. उत्तर प्रदेश पोलिसांनी या रुग्णाच्या आईसोबत संपर्क साधुन रुग्णाशी बोलणे करुन दिले. तिकडे गेल्या महिन्याभरापासून हा बेपत्ता असल्याने त्याची आई, भाऊ आणि नातेवाईक त्याचा शोध घेत होते. महिन्याभरानंतर त्याचा शोध लागला, त्याची आई, भाऊ, नातेवाईक आनंदीत झाले. त्याची आई, भाऊ व नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास टाकला.अथक प्रयत्नानंतर रुग्णाची त्याच्या परिवाराशी भेट घडवून आणली.  रुग्णालय प्रशासनाच्या सहृदयतेचा हा परिचय यानिमित्ताने झाला.  या रुग्णाच्या नातेवाईकांना त्याच्या अपस्मार आजाराबाबत माहिती असल्याने त्यांनी त्याच्या खिशात संपुर्ण पत्ता लिहिलेली चिठ्ठी ठेवली होती. तिच पोलिसांनी जपून ठेवली होती. त्यावरुनच सर्व उलगडा झाला.

            या रुग्णाची देखभाल करण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभीये यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधीक्षक भुपेन्द्र पाटील, अस्थिव्यंगोपचार विभागाचे प्रमुख डॉ.गजेन्द्र  रघुवंशी, डॉ.अमित जाधव, डॉ.आकाश, अधिसेविका ग्रेसी मारीयान, समाजसेवा अधीक्षक अमोल शेंडे, परिचारीका यांनी विशेष परिश्रम घेतले.

Previous Post

Old Pension Scheme: सरकारी कर्मचारी, शिक्षकांना राज्य शासनाचा दणका, संप काळातील सात दिवसांच्या वेतनाला कात्री!

Next Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाव्दारे ‘मिशन थायरॉईड’; दर गुरुवारी ओपीडीत होणार उपचार

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
Meenakshi Gajbhiye

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाव्दारे ‘मिशन थायरॉईड’; दर गुरुवारी ओपीडीत होणार उपचार

पशुसंवर्धन यशकथा १

शेतीला पशुपालनाची जोड दिली, दुध आणि शेणखतामुळे आली आर्थिक समृद्धी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.